नागपूर,
Vikas Nagar Nagpur- ज्ञानोपासक गुरुचरित्र पारायण मंडळ, नागपूर यांच्या वतीने यंदाही पौष शुद्ध द्वितीये निमित्त श्री सद्गुरु नृसिंह सरस्वती स्वाती महाराज, कारंजा (लाड) यांचा जन्मोत्सव सोहळा सोमवार, दि. २२ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम विकास सभागृह, विकास नगर, साई वर्धा रोड, नागपूर येथे होणार आहे.
सकाळी ६ वाजता अखंड गुरुचरित्र साखळी पारायणाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. ९ वाजता ह. भ. प. वर्षा मुलमुले यांचे कीर्तन, त्यानंतर सकाळी १०.३० वाजता मंडळाच्या परंपरेनुसार जन्मोत्सवाची पदे व पाळणा सादर केला जाणार आहे.Vikas Nagar Nagpurदुपारी १२ वाजता माध्यान्ह आरती व भिक्षावळ, दुपारी ४ पालखी सोहळा तर सायंकाळी ५ वाजता महाआरती होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.या जन्मोत्सव सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक रविंद्र पाटील यांनी केले.
सौजन्य :रविंद्र पाटील,संपर्क मित्र