तुम्ही मुलांना सकाळी कसे उठवता?

    दिनांक :19-Dec-2025
Total Views |
wake children up in morning कामावर जाणाऱ्या पालकांसाठी मुलांना सकाळी जागं करणे एक मोठी जबाबदारी बनली आहे. घरातील रोजच्या धावपळीमध्ये स्वयंपाकघरातील सुगंध, आवाज आणि गडबडी यांच्यात मुलांना उठवण्याचे काम पालक करत असतात. मात्र, नुकत्याच झालेल्या संशोधनात असे आढळले आहे की, पालक जेव्हा मुलांना चुकीच्या पद्धतीने झोपेतून उठवतात, तेव्हा त्यांचे मानसिक आरोग्य प्रभावित होते आणि नैराश्याचा धोका वाढतो.
 
 
 
wake children up in morning
संशोधनानुसार, अचानक आणि जोरात उठवणे, मोठ्याने ओरडणे, पाण्याचा झटका देणे, पांघरूण ओढणे, घाई करून सक्ती करणे किंवा शारीरिक बळाचा वापर करणे मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यास हानिकारक ठरते. अशा पद्धतींमुळे मुलांच्या शरीरात स्ट्रेस हार्मोन ‘कॉर्टिसोल’ वाढतो, ज्यामुळे नैराश्य, चिडचिडेपणा आणि एकाग्रतेचा अभाव होऊ शकतो.
पालकांनी मुलांना झोपेतून हळुवारपणे जागं करणे गरजेचे आहे. यासाठी काही प्रभावी मार्ग आहेत: मुलांच्या अंगावर प्रेमाने स्पर्श करणे किंवा त्यांचे नाव घेणे, खिडक्यांचे पडदे उघडून नैसर्गिक प्रकाश खोलीत येऊ देणे, त्यांना जागं होण्यासाठी ५–१० मिनिटांचा वेळ देणे आणि सकाळी उठल्यावर प्रेमाने संवाद साधणे. UNICEF च्या पालकत्व मार्गदर्शक तत्त्वांनुसार, हळुवार आणि प्रेमळ पद्धतीने मुलांना जागं केल्यास त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी चांगल्या सवयी तयार होतात आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक राहते.