श्याम पांडे
दारव्हा,
municipal-council-results : येथील नगर परिषद अध्यक्ष व प्रभागातील नगरसेवकांची निवडणूक 2 डिसेंबरला पार पडली. त्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरला जाहीर होणार आहे. प्रत्येक पक्षातील उमेदवार व कार्यकर्त्यांकडून मिळणाèया हक्काच्या मतांची उजळणी सुरू आहे. त्यामुळे या निवडणुकीत नेमके कोणते ‘व्यंजन’ भारी ठरणार, हे रविवारीच समोर येणार आहे.
नगर परिषद निवडणुकीत दारव्ह्यात 71.42 टक्के मतदान झाले. या निवडणुकीचा निकाल आधी 3 डिसेंबर रोजी लागणार होता. मात्र न्यायालयाने काही नपच्या निवडणुका समोर ढकलल्यामुळे 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या लांबलेल्या काळात उमेदवारांची धाकधूक वाढली असून त्यांनी मिळालेल्या हक्कांच्या मतांची उजळणी करून आपणच कसे निवडून येणार, याची खात्री देणे सुरू केली आहे.
तर मतदारांचे लक्ष उमेदवारांच्या उजळणीतील नेमके कोणते ‘व्यंजन’ बाजी मारणार याकडे लागले आहे. क-कमळाचा, घ-घड्याळीचा, ध-धनुष्य बाणाचा की प-पंजाचा यापैकी कोणाच्या गळ्यात विजयी माळ पडणार हे निकालाअंती लक्षात येणार आहे. या चर्चेमुळे मतमोजणीच्या या लांबलेल्या काळात शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
नप अध्यक्षपद आणि नगरसेवकांच्या जागांसाठी रिंगणात उतरलेल्या उमेदवारांमध्ये आपणच विजयी होऊ, अशी उत्सुकता लागली आहे. मतदानानंतर ते मतमोजणीपर्यंतच्या दिवसामधील कालावधीत अनेक उमेदवारांनी व राजकीय तज्ज्ञांनी आपआपली गणिते मांडली आहेत. काहींनी अनौपचारिक ‘एक्झिट पोल’द्वारे विजयाचा दावा केला आहे.
निवडणुकीत अनेक प्रभागांमध्ये चुरशीची लढत आहे, काही ठिकाणी क्रॉस मतदान झाल्याची चर्चा आहे. ज्यामुळे निकाल अनपेक्षित ठरू शकतो. दारव्हा नगर परिषदेत सत्ताधारी गटाला सलग दुसèयांदा संधी दिली जाऊ शकते, की दुसèया पक्षाकडे सत्ता जाऊ शकेल हे निकालाअंती ठरणार. हा विजयी निकाल शहराच्या पुढील पाच वर्षांच्या विकासाची दिशा ठरवणारा ठरणार आहे हे मात्र निश्चित.