यवतमाळातील सात मतदान केंद्र आदर्श

    दिनांक :19-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
yavatmal-polling-station : नगरपरिषद यवतमाळ सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता एकूण 248 मतदान केंद्रांपैकी 7 मतदान केंद्रे ‘आदर्श मतदान केंद्रे’ बनवण्यात आलेली आहेत.
 
 
YTL
 
 
 
पहिले मतदान केंद्र ‘सखी मतदान केंद्र’ असणार आहे. या ठिकाणी कार्यरत कर्मचारी महिला कर्मचारी असतील भारतीय महिला संघाने जिंकलेला क्रिकेट विश्वकप तसेच महिला सक्षमीकरणाचा संदेश देणे या थीमवर आधारित हे मतदान केंद्र असणार आहे.
 
 
दुसरे मतदान केंद्र निरोगी आरोग्य याचा संदेश देणारे असेल. यामध्ये योग व्यायाम याचे आयुष्यातील महत्त्व दर्शविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तिसरे मतदान केंद्र हे दिव्यांगांद्वारे चालवले जाणारे मतदान केंद्र असेल दिव्यांग सक्षमीकरचा संदेश याद्वारे दिला जाणार आहे.
 
 
चौथे मतदान केंद्र स्वच्छतेचा संदेश देणार आहे. परिसराची स्वच्छता, स्वच्छ व सुंदर निसर्गाचे महत्त्व याद्वारे अधोरेखित केले जाणार आहे. पाचवे मतदान केंद्र पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे असणार आहे. सहावे मतदान केंद्र कृषी क्षेत्राच्या थीमवर आधारित असेल. सातवे मतदान केंद्र वाहतुकीचे नियम, त्यांचे महत्त्व याबाबत जनजागृती करणारे मतदान केंद्र असणार आहे.