’युवा संमेलनातून’ युवा मोर्चा फुंकणार निवडणुकीचे रणशिंग

मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मेळाव्याला प्रमुख उपस्थिती

    दिनांक :19-Dec-2025
Total Views |
नागपूर,
nagpur-news : नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी मैदानात ताकदीने उतरली आहे. भारतीय जनता पक्षाची युवा आघाडी असलेल्या ’युवा मोर्चाने’ महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यासाठी २० डिसेंबर रोजी ’युवा संमेलनाचे’ आयोजन केले आहे.
 
 

NGP 
 
 
 
युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सचिन करारे यांच्या नेतृत्वाखाली हे महाल येथील ऐतिहासिक चिटणीस पार्क मैदानावर सायंकाळी ५ वाजता होणार आहे. मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते आणि आमदार संदीप जोशी, विदर्भ प्रांत संघठन मंत्री उपेंद्र माजी खासदार अजय संचेती, भाजपा महाराष्ट्राचे उपाध्यक्ष संजय भेंडे, भाजयुमो महामंत्री शिवानी दानी वखरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा होईल. हजारो युवक या मेळाव्याला उपस्थित राहणार असून युवा पदाधिकार्‍यांच्या प्रभागनिहाय बैठका घेण्यात आल्या आहेत. मोठ्या संख्येने युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.