कारंजात प्रथमच होणार उद्या दिव्यांगांचा कलामहोत्सव

*जागतिक दिव्यांग दिनानिमित्त कारंजा कला क्रीडा अकादमी व अन्य संघटनांचा पुढाकार

    दिनांक :02-Dec-2025
Total Views |
कारंजा घाडगे,
arts-festival-of-the-disabled : शहरात प्रथमच जागतिक दिव्यांग दिनाच्या पर्वावर उद्या बुधवार ३ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता येथील स्वर्गीय मन्नालाल मातादिन अग्रवाल सभागृहात दिव्यांगांचा कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कारंजा कला क्रीडा अकादमी, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना, माहिलोन्नती बहुउद्देशीय संस्था, सुदीप भांगे मित्र परिवार व जीएलके अपंगांची बहुउद्देशीय संस्था, कारंजा घाडगे यांच्या संयुक्तवतीने आयोजित या कला महोत्सवाचे उद्घाटन स्वाती विजेकर व हरेश विजेकर या रिल स्टारच्या हस्ते पार पडणार आहे.
 
 
 
jlk
 
 
यावेळी कवी, गझलकार, चित्रपट सहकलाकार, निर्माता, दिग्दर्शक तसेच शब्द मराठी विश्व साहित्य संमेलन संयोजक संजय सिंगलवार यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. अध्यक्षस्थानी कला महोत्सवाचे मुख्य आयोजक कारंजा कला क्रीडा अकादमी कारंजाचे अध्यक्ष विलास वानखडे राहतील. कारंजा पंस गटविकास अधिकारी प्रवीण देशमुख, प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे अध्यक्ष हरिभाऊ हिंगवे, माहिलोन्नती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष ज्योती यावले, संताजी सांस्कृतिक सेवा मंडळाचे उपाध्यक्ष सुदीप भांगे, जीएलके अपंगांची बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अशोक कामडी, वर्धा जिल्ह्यातील दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
 
 
यावेळी दिव्यांगाच्या अंगी असणार्‍या विविध कला दिव्यांग बांधव सादर करणार आहेत. मान्यवरांच्या हस्ते पुष्प, सन्मानचिन्ह, ग्रामगीता, सन्मानपत्र प्रदान करून दिव्यांग कलाकारांना सन्मानित करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त दिव्यांग बंधू-भगिनी तसेच रसिक नागरिकांनी या दिव्यांग कला महोत्सवाला उपस्थित राहून दिव्यांग बांधवाचे कौतुक करूया, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.