भंडारा जिल्ह्यात चार नगर पालिकेसाठी उत्साहात मतदान

साडेतीन वाजेपर्यंत 46.28 टक्के मतदान

    दिनांक :02-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
भंडारा, 
bhandara-elections : जिल्ह्यातील चार नगर परिषदांच्या अध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी आज झालेले शांततेत पार पडले असले, तरी उमेदवारांना अस्वस्थ करणारे होते. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत चारही नगर परिषदा मिळून 46.28 टक्के मतदान झाले होते. दरम्यान संध्याकाळी चार नंतर मतदारांना हुरूप आल्याने मतदान केंद्रांवर मतदारांच्या भल्यामोठया रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अंतिम आकडेवारी करू शकली नाही. मात्र हे मतदान 70 ते 75 टक्केच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. आजच्या मतदानासोबतच नगराध्यक्ष पदाच्या 4 आणि नगरसेवक पदाच्या 98 लोकांचे भाग्य मशीन बंद झाले आहे.
 
 

bhandara