जिल्हाधिकारी कार्यालय परिसर होणार हिरवाकंच

*विविध प्रजातींच्या रोपट्यांची लागवड

    दिनांक :02-Dec-2025
Total Views |
वर्धा, 
collectors-office : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुसज्ज इमारतीत विविध कामे पूर्ण केली जात आहे. पण, जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर ग्रीन झोन म्हणून विकसित झाला नव्हता. जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात विविध प्रजातींच्या हजारो वृक्षांची लागवड करण्यात येत आहे.
 

jkm 
 
सामाजिक वनीकरण विभागाच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विविध प्रजातींची रोपटे लावण्यात येत आहेत. हा उपक्रम सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी सुहास वाढेकर यांच्या देखरेखीखाली राबवला जात आहे. विभागाच्या चमूने रिकाम्या जागा ओळखून त्या ठिकाणी पर्यावरण अनुकूल व दीर्घायू प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यास सुरूवात केली आहे. ही झाडे मोठी झाल्यानंतर परिसर अधिक आकर्षक आणि पर्यावरण अनुकूल होईल, अशी आशा अधिकार्‍यांनी व्यत केली आहे. या हरित वातावरणामुळे कार्यालयात येणारे नागरिक आणि कर्मचार्‍यांना अधिक चांगले आणि शांततामय वातावरण मिळेल.