दाते महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद उत्साहात

डिजिटल इंडिया ते स्मार्ट इंडियाकडे वाटचाल

    दिनांक :02-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
date-college-national-conference : बाबाजी दाते महाविद्यालयात ‘डिजिटल इंडिया टू स्मार्ट इंडिया मल्टीडिसिप्लिनरी स्टडी ऑफ एज्युकेशन, एआय अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ या विषयावर भव्य एक दिवसीय राष्ट्रीय परिषद उत्साहात पार पडली. या परिषदेत देशभरातील 300 हून अधिक संशोधक, विद्यार्थी व उद्योगतज्ज्ञांनी सहभाग नोंदवत कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, डिजिटल शिक्षण आणि शाश्वत विकास या प्रमुख विषयांवर आपले मत मांडले.
 
 

y2Dec-Digital 
 
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांच्या पाठबळामुळे महाविद्यालयाला प्राप्त झालेल्या स्मार्ट क्लासरूम, डिजिटल लॅब आणि संशोधन उपक्रमांच्या आधारे ही परिषद अत्यंत यशस्वीपणे आयोजित करण्यात आली. 1959 मध्ये केवळ 145 विद्यार्थ्यांपासून सुरुवात झालेल्या या संस्थेने आज 2100 हून अधिक विद्यार्थ्यांसह शिक्षण, संशोधनात उल्लेखनीय स्थान निर्माण केले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसजीबीएयूचे कुलगुरू प्रा. महेंद्र ढोरे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल परिवर्तनाशी जुळवून घेण्याचे आवाहन करत, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स आणि रोबोटिक्स हे उद्याचे भविष्य असून विद्यापीठ विद्यार्थ्यांना संशोधनासाठी आवश्यक सर्व सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन केले.
 
 
मिलिंद साठे यांनी पीपीटी आणि व्हिडिओच्या माध्यमातून जगातील एआय वापराचे व्यापक सादरीकरण केले. अमेरिकास्थित सायनर्जी एआय रोबोटिक्स कंपनीचे सीईओ प्रतीक आठवे यांनी डिजिटल युगातील करिअर संधींचे याव मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे अध्यक्ष विनायक दाते यांनी संस्थेच्या 65 वर्षांच्या परंपरेचा गौरव करत, ‘एआय’च्या नव्या युगात विद्यार्थ्यांनी नवोन्मेषाचा मार्ग स्वीकारला पाहिजे, असे मत व्यक्त केले.
 
 
प्राचार्य डॉ. राजेश शिंगरू, उपप्राचार्य डॉ. ताराचंद कंठाळे यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. परिषदेत देशभरातील संशोधकांनी एआय, रोबोटिक्स, सस्टेनेबल डेव्हलपमेंट यांसारख्या विषयांवर संशोधन पेपर सादर केले. प्रा. योगेश निखार, प्रा. चिंतामण, डॉ. राम पंचभाई व मंदार जोशी यांनीही आपले संशोधन मांडून लक्ष वेधले.
 
 
सर्व सहभागींसाठी किट, बॅग, जेवण, तसेच उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे परिषदेला विद्वत्तेचा आणि शिस्तीचा उत्तम समन्वय साधता आला. संचालन शुभम चांभारे यांनी केले. प्रास्ताविक आशिष कांबळे यांनी केले.