नागपूर,
Abhyankar Nagar अभ्यंकर नगर येथील श्री हनुमान मंदिरात येत्या गुरुवार, ४ डिसेंबर २०२५ रोजी श्री दत्त जयंती निमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ५:३० वाजता होणार असून, प्रथम श्री गुरुचरित्रातील दत्त जन्माचा अध्याय पठण होईल. त्यानंतर ठीक ६:०० वाजता भगवान दत्तात्रेयांचा जन्म सोहळा व आरती होईल.

दत्तजन्मानंतर भगवान दत्तात्रेयांच्या तीन प्रमुख अवतारांवर श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी, श्रीनृसिंह सरस्वती महाराज आणि श्री स्वामी समर्थ महाराज आधारित “त्रयमूर्तीचा अपूर्व संगम” या शीर्षकाखाली विशेष संगीत कार्यक्रम आयोजित आहे. Abhyankar Nagar हा कार्यक्रम कविवर्य स्व. मुकुंद पुल्लीवार यांच्या गीतांवर आधारित असून, त्यांना स्वरबद्ध करण्याचे काम स्व. भय्या सामक यांनी केले आहे. ही गीते श्याम देशपांडे यांच्या सुरेल आवाजात सादर होणार असून, त्यांना जयंत उपगडे, विवेक अलोणी आणि अविनाश घांगरेकर यांचा सहवास लाभणार आहे. सोहळ्यासाठी प्रसाद आणू इच्छिणाऱ्या भाविकांनी दुपारी ५ वाजण्यापूर्वी मंदिरात प्रसाद जमा करावा. कार्यक्रमानंतर प्रसाद वितरण करण्यात येईल. वस्तीतील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री हनुमान मंदिर सेवा समितीतर्फे करण्यात आले आहे.
सौजन्य: अभय चोरघडे, संपर्क मित्र