बनावट मतदान प्रकरणी तिन गुन्हे दाखल, चौकशी सुरु

    दिनांक :02-Dec-2025
Total Views |
बुलढाणा, 
fake-voting-case : बुलढाणा शहरातील गांधी प्राथमिक शाळा येथील दोन मतदान केंद्रावर तिन आरोपींनी बनावट मतदान केल्याप्रकरणी मतदान केंद्राधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुलढाणा शहर पोलिसस्टेशनमध्ये दि. २ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन आरोपींना बुलढाणा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी सुरु केली आहे.
 
 
 
bul
 
 
 
बुलढाणा येथील प्रभाग क्रमांक १५ मधील मतदान केंद्र १५/३ या मतदान केंद्रावर आरोपी विशाल शालिग्राम इंगळे या इसमाने महेश नामदेव सपकाळ यांच्या नावे मतदान केल्याचे निदर्शेनास आल्यावरून मतदान केंद्राधिकारी सुरेंद्र पुंडलिक जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याच केंद्रावर मंगेश रामकृष्ण ताडे या मतदाराच्या नावावर अज्ञात आरोपींने मतदान केल्याचे उघड झाले आहे. तसेच मतदान केंद्र क्रमांक १५/४ या मतदान केंद्रावर वैभव दत्तात्रय देशमुख या मतदाराच्या नावाने प्रविण चिंतामण हरमकार रा. कोथळी ता. मोताळा या व्यक्तीने मतदान केल्याचे उघड झाल्यावरून या मतदान केंद्राचे केंद्राधिकारी सुनिल अण्णा इंगळे यांनी बुलढाणा शहर पोलिस स्टेशनला बनावट मतदान केल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. यावरून तिन्ही प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसस्टेशन मध्ये भारतीय न्याय संहिता १७४,१७२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन आरोपी बुलढाणा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी सुरु आहे.