आधी मतदान मग शुभ मंगल सावधान!

चंद्रपूर जिल्ह्यात 1.30 वाजेपर्यंत सरासरी 25.57 टक्के मतदान

    दिनांक :02-Dec-2025
Total Views |
चंद्रपूर,
chandrapur voting राजुरा नगर परिषदेच्या निवडणुकीत स्थानिक जवाहर नगर येथे राहणारे साहिल सोळुंके यांनी आपल्या विवाहापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील मतदान केंद्रावर जाऊन आधी मतदान केले. हळद लागली असताना आणि परिवारात विवाहाची लगबग असतानादेखील त्यांनी व या कुटुंबातील सर्वांनी मतदान करून एक चांगला संदेश दिला. दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातील 9 नगरपरिषद व 1 नगरपंचायतीत मंगळवारी दुपारी 1.30 वाजेपर्यंत सरासरी 25.57 टक्के मतदान झाले आहे.
 
 

first vote 
 
जिल्ह्यात एकूण 10 अध्यक्ष व 226 सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी मतदार सुरू असून, सकाळी 7.30 ते 1.30 वाजेदरम्यान मतदानाची एकूण सरासरी 25.57 टक्के एवढी आहे. आतापर्यंत सर्वाधिक 44.29 टक्के मतदान भिसी नगर पंचायतीत झाले. तर गडचांदूर नगर परिषदेत सर्वात कमी म्हणजे, केवळ 16.43 टक्केच मतदान झाले आहे. नगर परिषद बल्लारपूर येथे 25.03 टक्के, भद्रावती 22.65, ब्रम्हपुरी 28.52, चिमूर 27.30, गडचांदूर 16.43, मूल 31.60, नागभीड 34.26, राजुरा 24.33, वरोडा नगर परिषदेत 21.75, तर भीसी नगर पंचायतीत 44.29 टक्के एवढे मतदान झाले आहे.chandrapur voting दरम्यान, राजुरा विधानसभेचे माजी आमदार तथा शेतकरी नेते वामन चटप सपत्नीक मतदान केले. गडचांदूर येथील बुथ क्रमांक 5 मधील दोन मतदान यंत्र बंद पडले होते.