हिंगणघाट,
hinganghat-voting : येथील नगरपरिषदेत एक नगराध्यक्ष आणि ३७ नगरसेवकांसाठी आज मंगळवार २ रोजी झालेल्या मतदानामध्ये प्रभाग १, मतदान केंद्र लाला लजपत राय शाळेत सायंकाळी ७ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. तसेच प्रभाग १०, मतदान केंद्र अंगणवाडी नन्नाशा वार्ड येथे सुद्धा मतदान ७ वाजता सुरू असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी प्रशांत उरकुडे व सहाय्यक विशाल ब्राह्मणकर यांनी दिली.
सदर दोन्ही मतदान केंद्रांवर मतदानाच्या अंतिम म्हणजे ५.३० वाजता मोठ्या संख्येमध्ये मतदार मतदान करण्याकरिता आले असता त्यांना मतदान केंद्राच्या आत प्रवेश देऊन चिठ्ठ्या देण्यात आल्या. त्यानुसार मतदानाची प्रक्रिया सायंकाळी ७ ते ७.१५ पर्यंत सुरू असल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने दिली. विशेष म्हणजे, २ डिसेंबरला झालेल्या मतदानामध्ये शहरातील १०४ मतदान केंद्रातून कसल्याही प्रकारची अप्रिय घटनेची तक्रार आली नसून मतदान शांतता व सुव्यवस्थेत पार पडली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे यांनी दिली.