नागपूर ,
MAASU University ३ डिसेंबर २००० रोजी स्थापन झालेले महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू) आज २५ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण करत आहे. “शिक्षण, संशोधन आणि विस्तार” या त्रिसूत्री ध्येयावर आधारित हे विद्यापीठ आज पशुसंवर्धन, दुग्धोत्पादन, मत्स्य संवर्धन आणि वन्यजीव संशोधनात राष्ट्रीय स्तरावरील अग्रणी ज्ञानकेंद्र म्हणून ओळखले जाते.स्थापनेवेळी पाच पशुवैद्यकीय महाविद्यालये, एक पदव्युत्तर संस्था व एक दुग्धतंत्रज्ञान महाविद्यालय मिळालेल्या माफसूने पुढील काळात दोन मत्स्य विज्ञान महाविद्यालये, आणखी एक दुग्धतंत्रज्ञान महाविद्यालय, वन्यजीव संशोधन केंद्र आणि तीन कृषी विज्ञान केंद्रे अशी उल्लेखनीय संस्थात्मक वाढ साध्य केली.

२५ वर्षांत विद्यापीठाने पशुजनुकशास्त्र, जैवतंत्रज्ञान, रोगनियंत्रण, लसीकरण, मत्स्य संवर्धन, दुग्धउद्योगातील मूल्यवृद्धी, फूड सेफ्टी आणि जैवसुरक्षा या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण संशोधन केले. MAASU University ग्रामीण भागात ब्लू इकॉनॉमी, पशुपालक व मच्छीमार सशक्तीकरण, उद्योजकता प्रशिक्षण यांसारख्या उपक्रमांतून विद्यापीठाने रोजगारक्षमतेला मोठी चालना दिली.आज माफसू हे शिक्षणसंस्था नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेला दिशा देणारे विचारमंच आणि पशुसंवर्धन क्षेत्रातील राष्ट्रीय परिवर्तनाचे नेतृत्व मानले जाते. भविष्यात तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षण, जैवसुरक्षा, खाद्य सुरक्षा बळकटीकरण, तसेच ग्रामीण युवक व महिलांचे कौशल्यवर्धन हे विद्यापीठाचे प्रमुख संकल्प असतील.
सौजन्य :प्रवीण बागडे,संपर्क मित्र