लग्नांनी घसरवला मतदानाचा टक्का, जिल्ह्यात सरासरी ६० टक्के मतदान

*नगराध्यक्ष, नगरसेवकांचे नशिब ईव्हीएमबंद *सिंदी रेल्वेने घेतली आघाडी, वर्धा सर्वात खाली

    दिनांक :02-Dec-2025
Total Views |
वर्धा, 
marriages-decline-voting-percentage : जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी २ रोजी मतदान होणार होते. शेवटच्या क्षणी देवळी नगरपरिषदेची निवडणूक पूर्णपणे रद्द करण्यात आली. वर्धा, हिंगणघाट आणि पुलगाव येथील सात नगरसेवक पदासाठी निवडणुकाही रद्द करण्यात आल्या. पाच नगरपरिषदांमध्ये ५ नगराध्यक्ष आणि १३९ नगरसेवकपदांसाठी आज मतदान झाले. मात्र, मंगळवारी लग्नांची मोठी धूम असल्याने वर्धेसह इतर नगरपरिषदांतील मतदानाचा टका घसरल्याचे दिसून येते. जिल्ह्यात सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सरासरी ६० टके मतदान झाल्याची शयता वर्तविण्यात आली. वर्धेत ५७.२९ टके, सिंदी रेल्वे ७१ टके, आर्वी ६१ टके, पुलगाव ६० टके मतदान झाले. वृत्त लिहिस्तोवर हिंगणघाट येथील मतदानाचा सरासरी आकडा मिळू शकला नाही.
 

voting 
 
जिल्ह्यात दीर्घ काळानंतर निवडणुका झाल्या. वर्धेत २० प्रभागांमध्ये नगराध्यक्ष आणि ४० नगरसेवकांची निवड करण्यात येणार आहे. नगराध्यक्षपदासाठी ८ तर नगरसेवक पदासाठी १९१ उमेदवार इच्छुक होते. हिंगणघाट येथे २० प्रभागांमधून ४० नगरसेवकांची निवड करण्यात येणार होती. येथे नगराध्यक्षपदासाठी १० तर नगरसेवकासाठी २२७ उमेदवार, आर्वीत १२ प्रभागांमधून २५ नगरसेवकांची निवड करण्यात येणार आहे. नगध्यक्षपदासाठी ६ आणि सदस्यपदासाठी ८६ उमेदवार, पुलगाव येथे १० प्रभागांमधून नगराध्यक्ष आणि २१ नगरसेवकांची निवड करण्यात येणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी ८ आणि नगरसेवकसाठी ११७ इच्छुक होते. सिंदी रेल्वेमध्ये १० प्रभागांमधून २० नगरसेवकांची निवड होणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी ६ आणि नगरसेवक पदासाठी ९८ इच्छुक होते. वर्धेचे दोन प्रभाग, पुलगावातील दोन प्रभाग आणि हिंगणघाटच्या ३ प्रभागांच्या निवडणुका रद्द करण्यात आल्या.
 
 
आज मंगळवारी लोकशाहीचा उत्सव आणि लग्नाचा मुहूर्त असल्याने मतदार लग्नकार्यात व्यस्त होते. त्यामुळे या लग्न कार्याचा विपरित परिणाम मतदानावर झाला. वर्धा येथे सकाळी ११.३० वाजेपर्यंत १९.७९ टके, हिंगणघाट १८.४ टके, आर्वी १८.९२ टके, पुलगाव १३.४० तर सिंदी रेल्वे येथे १८.१६ टके मतदान झाले. पाचही नप क्षेत्रात सकाळी ११.३० पर्यंत १८.२४ टके मतदान झाले होते. दुपारी १.३० पर्यंत वर्धेत ३०.७९ टके, हिंगणघाट ३०.८७, आर्वी ३२.०१, पुलगाव २४.८७ तर सिंदी रेल्वे येथे ३२.०४ टके असे सरासरी ३०.३८ टके मतदान झाले. दुपारी ३.३० पर्यंत वर्धेत ४३.६३ टके, हिंगणघाट ४५.६७, आर्वी ४५.५९, पुलगाव ३८.१९ तर सिंदी रेल्वे ५१.४० टके अशी सरासरी ४४.४० टके जिल्ह्यात मतदान झाले होते. वर्धा नगर पालिकेत नगराध्यक्षपदाकरिता तिहेरी लढत झाली. आर्वी, पुलगाव, सिंदी रेल्वे येथे दुहेरी लढत झाली.