नागपूर,
deekshabhoomi-memorial-committee : दीक्षाभूमीच्या सुधारित विकास आराखडा निश्चित करण्यापूर्वी समाज कल्याण विभागाने दीक्षाभूमी स्मारक समिती, डिझाईन असोसिएट्स इन कॉर्पोरेशन यांची संयुक्त बैठक घेऊनच आराखड्यास अंतिम मंजुरी द्यावी, अशी मागणी दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव डॉ.राजेंद्र गवई यांनी पत्रपरिषदेत केली. विलास गजघाटे, डॉ. प्रदीप आगलावे, भन्ते नागदिपांकर, डी.जी. दाबाळे उपस्थित होते.
दीक्षाभूमी विकासाचा तिसर्या क्रमांकाचा आराखडा स्वीकारला असल्याचे वृत्त दिशाभूल करणारे आहे. यासंदर्भात दीक्षाभूमी स्मारक समितीची कोणतीही बैठक बोलाविण्यात आली नाही. किंवा समितीच्या कोणत्या सदस्यांसोबत चर्चा देखील झाली नाही. त्यामुळे तिसर्या क्रमांकाचा आराखडा मंजूर करण्याचा प्रश्नच येत नाही. डिझाईन इन कार्पोरेशनने भूमिगत कामे वगळून इतर विकासकामाचे चार आराखडे समितीला ८ सप्टेंबर २०२५ रोजी दीक्षाभूमी स्मारक समितीला सादर केले होते.
दीक्षाभूमी स्मारक समितीच्या अध्यक्षांनी त्वरित समितीची बैठक घेऊन त्यावर चर्चा करून समितीची मंजुरी घ्यायला होती. परंतु समितीची बैठकच घेण्यात आली नाही. त्यामुळे समितीचे सर्व सदस्य या तिसर्या क्रमांकाचा आराखड्याबाबत आहेत.
दीक्षाभूमीच्या विकासकामाच्या आराखड्याबाबत चर्चा करून जो आराखडा योग्य ठरेल तो आराखडा मंजूर करून विकास कामास गती देण्यात यावी. नागपूर महानगर प्रदेश प्राधिकरणाचर आयुक्त यांच्यासोबत समितीच्या सदस्यांची बैठक ऑक्टोबर महिन्यात झाली होती.