मुंबईचा ‘पिंक सीझन’ सुरू; फ्लेमिंगोंच्या उशिरा आगमनाचे कारण काय?

    दिनांक :02-Dec-2025
Total Views |
मुंबई,  
mumbai-pink-season मुंबई आणि नवी मुंबईत पुन्हा एकदा “पिंक सीझन”ची चाहूल लागली आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही फ्लेमिंगो पक्ष्यांचा पहिला समूह शहरात दाखल झाला असून, त्यांच्या परतीनं उपसागर किनाऱ्यांवर उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. यावेळी पावसाळा लांबल्यामुळे पक्ष्यांचे आगमन काहीसे उशिरा झाले; तरीही खाड्या आणि तलावांवरून उडत आलेल्या या गुलाबी पाहुण्यांनी यंदाचं स्थलांतर हंगाम समृद्ध होणार, अशी आशा पक्षीप्रेमींमध्ये निर्माण केली आहे.
 
mumbai-pink-season
 
थाणे क्रीक परिसरात साधारण ३०० ग्रेटर फ्लेमिंगो दिसल्याची माहिती संशोधक मृगांक प्रभूंनी दिली. नेरुळमधील डीपीएस फ्लेमिंगो लेक येथेही पक्ष्यांची सुरुवातीची हालचाल दिसून आली असून लवकरच मोठे कळप येण्याची शक्यता असल्याचे थाणे क्रीक फ्लेमिंगो अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत बहादुरे यांनी सांगितले. या आगमनाने मुंबईच्या अनौपचारिक “पिंक फेस्टिव्हल”चीही सुरुवात झाली आहे. नॅटकनेक्ट फाउंडेशनचे बी. एन. कुमार यांनी या निमित्ताने डीपीएस तलावाला ‘कन्झर्वेशन रिजर्व्ह’ घोषित करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन सरकारला केले. mumbai-pink-season एप्रिल महिन्यात राज्य वन्यजीव मंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली असून पर्यावरणप्रेमी आणि मंत्री गणेश नाईक यांच्या पाठिंब्यानंतर या निर्णयाला वेग आलेला आहे.
फ्लेमिंगोंचे आगमन हे मुंबईतील सतत कमी होत असलेल्या जलभूमींचे संरक्षण किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव करून देणारे असल्याचे पर्यावरण कार्यकर्त्यांचे मत आहे. नवी मुंबई एन्व्हायर्नमेंट प्रिझर्व्हेशन सोसायटीचे संदीप सरीन यांनी नागरिकांनी या “गुलाबी पाहुण्यांचे” मनापासून स्वागत करत त्यांच्या अधिवासाच्या रक्षणासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. फ्लेमिंगो हे केवळ पाहण्यासाठी आकर्षक नाहीत, तर ते परिसंस्थेचे रक्षक आहेत. mumbai-pink-season शैवाल, प्लँक्टन आणि सूक्ष्म जलचरांवर उपजीविका करणारे हे पक्षी जलातील पोषकद्रव्यांचे संतुलन राखतात. तसेच चिखल ढवळून पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण वाढवतात, ज्यामुळे मत्स्य आणि वनस्पती जीवनाला आधार मिळतो. म्हणूनच या गुलाबी पक्ष्यांचे आगमन हे मुंबईच्या धोक्यात आलेल्या खाड्या आणि दलदलीच्या प्रदेशांसाठी नवजीवन घेऊन येणारे मानले जाते.