बुलढाणा,
municipal-elections : नगरपरिषद निवडणूकीच्या मतदानाचा हक्क बजावितांना जिल्ह्यातील मतदारांनी स्वयंस्फुर्तीने मतदान करतांना बुलढाणा येथील दोन मतदान केंद्रावर बोगस मतदार नागरिकांच्या सर्तकतेने पकडण्यात आले. त्यांचे विरूद्ध दाखल झालेल्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच काही केंद्रावर बोगस मतदारांना कार्यकर्त्यांनी चोप दिला. याशिवाय मतदारांना मतदान मशीनपर्यंत घेऊन जाण्यावरून उमेदवारात खडाजंगी झाली. परंतू इतर १० पैकी ९ नगर पालिका क्षेत्रात शांततेत मतदान पार पडले. सरासरी अंदाजे जिल्ह्यात ७० टक्के मतदान मतदारांनी केले.
मतदान केंद्रावर सकाळपासूनच तरूण मतदार वयोवृद्ध, दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मुस्लीम व दलित बहुल प्रभागातील मतदरांमध्ये मतदानाचा प्रचंड उत्साह दिसून आला. दुपारी साडे तिन वाजेपर्यंत नगरपरिषद निहाय झालेले मतदान पुढीलप्रमाणे बुलढाणा (३९.३९), चिखली (४३.३७), जळगाव जामोद (५०.५५), खामगांव (४८.२६), लोणार (४९.५१), मलकापूर (५६.४९), मेहकर (५५.७९), नादूंरा(५१.८५), शेगांव (४९.९४), सिंदखेडराजा (५९.८०) सरासरी (४९.०४) सर्वात अधिक मतदान सिंदखेडराजा मध्ये तर सर्वात कमी मतदान जिल्ह्याचे मुख्यालय असलेले बुलढाण्यात झाले. जिल्ह्यातील सर्वात जास्त मतदान सिंदखेडराजा नगरपरिषद क्षेत्रामध्ये अंदाजे ८२ टक्के मतदान आहे. त्याखालोखाल मेहकर नगर परिषदेमध्ये मतदानांची अंतिम आकडेवारी प्राप्त झाली असून सायंकाळी ५: पर्यत एकूण (७३.३६) टक्के मतदान झाले आहे.