नागपूर,
Vilas Dangre : इतर कोणत्याही दुसर्या उपचार पद्धतीचा विचार न करता केवळ होमिओपॅथीद्वारे उपचार करणारे अनेक डॉक्टर कार्यरत आहेत. यात नवे प्रवाह आल्यामुळे हेमिओपॅथीला सातत्यपूर्ण संशोधनाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. विलास डांगरे यांनी केले.
भाऊजी दप्तरी स्मारक ट्रस्टतर्फे होमिओपॅथिक डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. राजेंद्र डोळके, तर प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध पद्मश्री डॉ. विलास डांगरे, तसेच डॉ. अरविंद कोठे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. यात डॉ. स्मिता ढोबळे, डॉ. अपर्णा साबू, डॉ. अमोल डॉ. रमाकांत कापरे, डॉ. राधिका मुरकुटे, डॉ. आभा मेहता यांचा समावेश आहे. यानंतर होमिओपॅथिक कॉलेजमधून अव्वल आलेल्या डॉ. आफरीन कुरेशी, मेघा दलाल या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. रूची जैन, डॉ. अविनाश तायडे, राम दप्तरी आदींनी परिश्रम घेतले.