मुख्यमंत्री फडणवीस 2029 नंतर केंद्रात जाणार?

    दिनांक :02-Dec-2025
Total Views |
मुंबई,
News from Chief Minister Fadnavis महाराष्ट्रात सध्या निवडणुकीचे वारे वाहत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्रात जाण्याचे संकेत दिले आहेत. भाजपामध्ये राज्यातच नव्हे तर देश पातळीवरही महत्त्वाचे स्थान असलेले फडणवीस यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 2029 नंतर पक्ष ठरवल्यास ते केंद्रात जाण्यास तयार आहेत. मात्र, सध्या त्यांचा फोकस महाराष्ट्रातील बदल घडविण्यावर आणि शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यावर आहे.
 
devendra fadnavis
 
 
फडणवीस म्हणाले की, सध्याच्या कार्यकाळात रोजच्या समस्यांवर लक्ष देणे गरजेचे आहे. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी अशी परिस्थिती येते, त्याला सामोरे जावे लागते. त्यांनी स्पष्ट केले की, सरकार एक संस्था म्हणून कशी टिकवता येईल, आर्थिक शाश्वतता कशी साधता येईल, पायाभूत सुविधा आणि उद्योग यामध्ये ऑटो पायलट मोडवर कसे जाऊ शकतो, यावरही त्यांचे प्रयत्न आहेत.
 
ते म्हणाले की, प्रशासनाचा अनुभव घेत त्यांनी मुख्यमंत्री पदावरून आतून बाहेरून समस्या पाहिल्या आहेत, त्यामुळे त्यांना अडचणींची कल्पना आहे आणि त्याचा महाराष्ट्रासाठी उपयोग करण्याचा प्रयत्न करणार आहेत. 2029 पर्यंत ते पूर्ण क्षमतेने काम करतील आणि नंतर पक्ष ठरवेल ती जबाबदारी स्वीकारतील. फडणवीस यांचा असा दृष्टिकोन सूचित करतो की, महाराष्ट्रातील बदल घडविण्यासोबतच, त्यांचा अनुभव केंद्रात कसा वापरला जाऊ शकतो, हे त्यांनी गांभीर्याने विचारले आहे.