नागपूर,
guru tegh bahadur शिख समाजाने विविध सामाजिक मदतीच्या माध्यमातून एक आदर्श समाजसेवेचा मापदंड आखून दिलेला आहे. श्रद्धा, सेवा आणि लोकसहभाग याला अधोरेखित करणार्या शिख समाजातील विविध सामाजिक संस्थांचे प्रमुख, समाजातील विविध सेवाभावी मंडळे व विविध शासकीय विभागांच्या परस्पर समन्वयातून नारा परिसरात ७ डिसेंबर रोजी कार्यक्रम यशस्वी करु, असा विश्वास जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी व्यक्त केला.
हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या शहिद शताब्दी समारोहानिमित्त होणार्या कार्यक्रमाची तयारी युद्धपातळीवर सुरु आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाधिकारी इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे विविध प्रमुख, पदाधिकारी यांची व्यापक बैठक झाली. या बैठकीस राज्यस्तरीय समितीचे विदर्भ अध्यक्ष गुरुमितसिंग खोक्कर, कार्यक्रमाचे राज्य समन्वयक रामेश्वर नाईक, परमजितसिंग भट्टी, प्रितपालसिंग भाटिया, सिंधी समाजाचे पदाधिकारी विक्की कुकरेजा, निवासी उपजिल्हाधिकारी अनूप खांडे उपस्थित होते.
विदर्भातील ११ जिल्ह्यातील भाविकांसाठी नागपूर येथे हा विशेष होत आहे. हा कार्यक्रम सर्वच दृष्टींनी सर्वोत्तम ठरावा, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी इटनकर यांनी यावेळी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे आयोजन आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. शासन सेवाभावाच्यादृष्टीने या कार्यक्रमासाठी कटीबद्ध आहे. मोठ्या संख्येने भाविकांची या कार्यक्रमाला उपस्थिती राहणार असल्याने लंगर, पार्किंग, इतर २४ प्रकारच्या सेवा पुरवाव्या लागणार आहेत.guru tegh bahadur कुठेही या आयोजनाला लागू नये, या दृष्टीने व्यापक स्तरावर व्यवस्था उभारण्यात येत आहेत. यासाठी सेवा देण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावे, असे आवाहनही इटनकर यांनी यावेळी केले. राज्यस्तरीय समितीचे विदर्भ अध्यक्ष सरदार गुरुमितसिंग खोक्कर यांनी लंघरसह पिण्याचे पाणी, पार्किंग व व्यवस्था उभारण्यासाठी मोठ्या संख्येने सेवादारांची गरज भासणार असून त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, आवाहन केले.