पीएफए आशिया रिजन-९ परिषदेत उत्कृष्ट कामगिरी

*शरद पवार डेंटल कॉलेज सन्मानित

    दिनांक :02-Dec-2025
Total Views |
वर्धा, 
pfa-asia-region-9-council : शरद पवार डेंटल कॉलेजने (एसपीडीसी) १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेज मुंबई येथे आयोजित पियरे फॉशार्ड अकॅडमी आशियन रिजन सेशन अ‍ॅट-लार्ज, रिजन-९ परिषदेत उल्लेखनीय कामगिरी करत अनेक सन्मान प्राप्त केले. पियरे फॉशार्ड फेलोशिप अवॉर्ड्स हे पियरे फॉशार्ड अकॅडमी या जागतिक संस्थेकडून प्रदान केले जाणारे अत्यंत प्रतिष्ठेचे पुरस्कार आहेत. दंत क्षेत्रातील उत्कृष्टता आणि नेतृत्व अधोरेखित करणार्‍या या पुरस्कारांसाठी लिनिकल प्रॅटिस, नैतिकता, शिक्षण आणि सामाजिक सेवेत विलक्षण योगदान देणार्‍या दंत व्यावसायिकांची निवड केली जाते.
 
 
 
clg
 
 
 
ही फेलोशिप मिळणे हे दंत चिकित्सकाच्या प्रामाणिकता, व्यावसायिक निष्ठा आणि दंत आरोग्याच्या प्रगतीसाठी त्यांच्या योगदानाचे गौरवचिन्ह मानले जाते. आंतरराष्ट्रीय दंत विज्ञान क्षेत्रातील हे सर्वात मानाचे सन्मानांपैकी एक मानले जाते. १६ ते १७ नोव्हेंबर रोजी डॉ. घाभी कस्पो यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये एसपीडीसीने बेस्ट डेंटल कॉलेज सायंटिफिक रिसर्च आणि बेस्ट डेंटल कॉलेज अकॅडमिक एसलन्स हे दोन महत्त्वाचे पुरस्कार पटकावले. या पुरस्कारांमुळे दंत शिक्षण, संशोधन आणि शैक्षणिक कामगिरी क्षेत्रातील एसपीडीसीचे अग्रस्थान पुन्हा अधोरेखित झाले. हे सन्मान संस्थेने नवोपक्रम, संशोधनसंस्कृती आणि विद्वत्तेच्या मूल्यांना दिलेल्या प्राधान्याची जाणीव करून देतात. १५ नोव्हेंबर रोजी डॉ. राशी दुबे यांना प्रतिष्ठित फेलोशिप अवॉर्ड प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे बालदंत विभागाचे (पेडोडॉन्टिस) नाव उज्ज्वल झाले.
 
 
एसपीडीसीच्या विद्यार्थ्यांनीही या कार्यक्रमात आपली उल्लेखनीय प्रतिभा सादर केली. खुशी चांडक आणि श्रुती यांना स्टुडंट ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला. तर रेबेका संजु, श्रेया देसराज, श्रावणी देशमुख, रोहिणी आणि पर्मी सिंह यांना बेस्ट स्लोगनसाठी गौरवण्यात आले. तसेच साक्षी बावनकर, किमया, श्रावणी आणि रेबेका यांना बेस्ट डेंटल आर्ट पुरस्कार मिळाला. या सर्वांचे मुख्य सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, उपकुलगुरू डॉ. ललितभूषण वाघमारे, प्र-उपकुलगुरू डॉ. गौरव मिश्रा, डॉ. श्वेता काळे (पिसुळकर), डॉ. राजीव बोरले, डॉ. तृप्ती वाघमारे, डॉ. संदीप श्रीवास्तव आदींनी कौतुक केले.