नियोजन विभागाच्या उपसंचालक पदभरतीत वयोमर्यादेत शिथिलता द्या

राज्य लोकसेवा आयोगाकडे उमेदवारांची मागणी

    दिनांक :02-Dec-2025
Total Views |
गोंदिया,
planning-department : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे अनुभव पात्र उमेदवारांसाठी परीक्षा आयोजित केली जाते. आयोगाने नियोजन विभागाच्या उपसंचालक पदासाठी नोव्हेंबर 2022 व ऑगस्ट 2023 मध्ये जाहिरात काढली. अर्जही मागविले. मात्र परीक्षा घेतली नाही. आता नुकतीच पुन्हा जाहिरात काढली आहे. त्यावेळी अनेक शासकीय नोकरीत कार्यरत अधिकार्‍यांनी अर्ज केले होते. आता पुन्हा आयोगाने नियोजन विभागाच्या उपसंचालक भरती संदर्भात जाहिरात काढली आहे. यात पूर्वी अर्ज केलेल्या काही उमेदवारांनी वयोमर्यादा ओलांडली आहे. अनेकांना उच्चतम अहर्ता धारण करूनही त्यांचे उच्चपदस्त अधिकारी होण्याचे स्वप्न अपूरे राहणार असल्याने अशा उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्याची मागणी महराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाला केली आहे. महराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे उप संचालक पदासाठी 16 नोव्हेंबर 2022 रोजी, 18 ऑगस्ट 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करून पात्र अहर्ताधारकांकडून अर्ज मागविले. यानंतर सदर परीक्षा होणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही.
 
 
jmlk
 
सेवा प्रवेशाचे नियम बदलण्याचे कारण पुढे करत जुन्या जाहिराती सप्टेंबर व ऑक्टोबर 2024 ला रद्द करण्यात आल्या. आता बर्‍याच कालावधीनंतर 28 नोव्हेंबर 2025 ला सदर पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. यात विविध प्रवर्गातील उमेदद्वारांना जातीनिहाय वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आली आहे. दरम्यान शासन सेवेत कार्यरत अनेक उमेदवारांनी सन 2022, 2023 मध्ये प्रसिद्ध जाहिरातीनुसार अर्ज केले. यानंतर मात्र आयोगाने परीक्षाच घेतली नाही. आता पुन्हा 28 नोव्हेंबर रोजी नियोजन विभागाच्या उपसंचालक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली.
 
 
दोनवर्षापूर्वी परीक्षा झाली असती तर अहर्ताधारक परीक्षार्थ्यांना उपसंचालक पदाची संधी मिळाली असती किंवा नियोजन विभागाकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला प्राप्त मागणीपत्राच्या दिनांकापासून 4 महिन्यांच्या आत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिरात प्रसिद्ध केली असती व वयोमर्यादेचा विचार करता यासाठी काही उमेदवार उपसंचालक पदासाठी पात्र ठरले असते. पहिली जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तीन वर्षांनी व दुसरी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर 2 वर्षे 3 महिन्यानंतर आता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यावेळी अर्ज करणार्‍या उमेदवारांनी वयोमर्यादा ओलांडली आहे. यामुळे उपसंचालक पदाच्या संधीपासून काही उमेदवार वंचित राहिले आहेत. जाहिरातीनुसार पीएचडी पदवीधारकांना अनुभवात 2 वर्षाची सूट देण्यात येत आहे त्याप्रमाणे पीएचडी पदवीधारकांना व आधीच्या जाहिरातीमध्ये पात्र उमेदवारांना या जाहिरातीसाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात यावी, वयोमर्यादेत सूट द्यावी, अशी मागणी आयोगाकडे करण्यात आली आहे.