बापरे..! एका वर्षातच रस्त्याचे वाजले तिनतेरा

रस्त्यावर जागोजागी पडले खड्डे : वाहनधारक त्रस्त

    दिनांक :02-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
मारेगाव, 
hiwara-mukta-road : एक वर्षापूर्वी करण्यात आलेल्या हिवरा ते मुकटा या रस्त्यावरील डांबर उखडायला लागले. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडत असून रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. याकडे संबंधित विभाग लक्ष देईल का, अशी विचारणा नागरिक करीत आहेत.
 
 
y2Dec-Hiwara
 
 
 
हिवरा ते मुकटा या साधारणतः दोन ते तीन किमी रस्त्याचे काम मागील वर्षी करण्यात आले. अनेक वर्षांपासून रस्त्याच्या कामाची प्रतीक्षा करणाèया नागरिकांना या रस्त्याच्या कामामुळे हायसे वाटले. आनंदही झाला, पण तो क्षणिकच टिकणारा ठरला. कारण नव्याने बनवण्यात आलेला रस्ता उखडायला लागल्याने व त्या जागी खड्डे पडायला लागल्याने नागरिकांच्या आनंदावर विरजण पडले.
हिवरा ते मुकटा रस्ता समोर चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्याला जोडल्या गेला आहे. मुकटा गावाच्या वेशीला लागून वर्धा नदी वाहते. याच वर्धा नदीवर मार्डा येथे बंधारा बांधण्यात आलेला आहे. यावरून मारेगाव ते वरोरा अशी मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. या रस्त्याचे काम करण्यात आले होते. त्यामुळे मारेगाव तालुक्यातील नागरिकांना वरोरा जायचे म्हटले तर वणी न जाता हा मार्ग सुलभ होता. परंतु हाच रस्ता आता उखडायला लागल्याने नागरिकांच्या यातना वाढणार आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीकडे त्वरित लक्ष देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.