रोव्हर्स रेंजर्स बनले मतदार स्वयंसेवक

    दिनांक :02-Dec-2025
Total Views |
वर्धा, 
municipal-council-elections : वर्धा नगर परिषद निवडणूक कार्यक्रमात देवळीच्या एसएसएनजे महाविद्यालयातील २० रोव्हर्स व रेंजर्सनी वर्धा शहरातील मतदान केंद्रावर वृद्ध, अपंग व महिला मतदारांना मतदार स्वयंसेवक म्हणून सेवा प्रदान केली.
 
 
ele
 
 
सदर मतदान प्रक्रियेत रोव्हर स्काऊटचे जिल्हा आयुत तथा मतदार स्वयंसेवक समन्वयक कॅप्टन मोहन गुजरकर, जिल्हा संघटक नितेश झाडे व रोव्हर लिडर प्रा. रवींद्र गुजरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक रेंजर लिडर कल्याणी लिखार, आरती मरघडे, कांचन देशमुख, साक्षी सातव, यामिनी पारधी, राधिका नागोसे, कुंदन कावडे, साक्षी पारीसे, पूर्वा कापटे, सलोनी अजमिरे, राम देशमुख, विपुल पेंदाम, तनिषा उईके, समीक्षा नेवारे, जानवी झोड, रश्मी मडावी, सोमेश्वर पोराटे, प्रवेश किटे, तेजस वाघाडे व स्नेहा मडकाम यांनी मतदार स्वयंसेवक म्हणून सेवा प्रदान केली.
 
 
वर्धा नगरपरिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी गणेश खताळे, स्विप नोडल अधिकारी तथा डायटचे प्राचार्य डॉ. मंगेश घोगरे, स्वीपचे सहाय्यक नोडल अधिकारी तथा वरिष्ठ अधिव्याख्याता संजय नवले व प्रशासकीय अधिकार्‍यांनी रोव्हर्स व रेंजरच्या उपक्रमाची प्रशंसा करून त्यांचे कौतुक केले.