अनिल कांबळे
नागपूर,
lovers affair दाेन तरुणींशी एकाच वेळी प्रेमसंबंध ठेवणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. दाेघींनाही प्रेमाची कुणकुण लागणार नाही, अशी काळजी घेतल्यानंतरही माेबाईलमधील एका फोटोमुळे प्रियकराचे बिंग फुटले. दगा देणाऱ्या प्रियकराविरुद्ध तरुणीने थेट पाेलिसांत लैंगिक शाेषणाची तक्रार दिली. पाेलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल करुन अटक केली. विक्की धनराज वंजारी (जरीपटका) असे आराेपी युवकाचे नाव आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आराेपी विक्की वंजारी याचे वडिल हे गाेंडवाना चाैकातील बैरामजी टाऊन येथे केअर टेकर आहेत. ते तेथील एका बंगल्याच्या आऊटहाऊसमध्ये कुटुंबासह राहतात. विक्की हा बारावी शिकलेला असून ताे गवंड्याकडे राेजमजुरीला जाताे. त्याची ओळख दयानंद पार्कमध्ये फीरायला येणाऱ्या 20 वर्षीय तरुणीशी झाली. ती तरुणी महाविद्यालयीन शिक्षण घेत असून तिची आर्थिक स्थिती चांगली आहे. विक्कीने तिच्याशी ओळख वाढवली आणि तिच्याशी मैत्री केली. तिला वारंवार मदत करायला लागला. तिला महाविद्यालयीन प्राेजेक्ट तयार करुन देण्याच्या बहाण्याने घरी बाेलावले. तिला बंगला स्वतःचा असल्याचे सांगितले. काही दिवसांत त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.lovers affair तिला लग्नाचे आमिष दाखवले. तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यादरम्यान, त्याची आणखी एका तरुणीशी मैत्री झाली. पहिल्या तरुणीला खबर न लागू देता त्या तरुणीलाही त्याने प्रेमाच्या जाळ्यात फसवले. तिलाही लग्नाचे आमिष दाखवले. दाेघींशीही त्याने प्रेमसंबंध ठेवले.
...........
असे फुटले बिंग
पहिली तरुणी लग्नाचा तगादा लावत असतानाच तिने विक्कीचा माेबाईल हाती घेतला. याचदरम्यान विक्कीला एका तरुणीने एक फोटो पाठवला. तिने फोटो बघितल्याबराेबर ती संतप्त झाली. तिने तिला फोटो करुन विचारणा केली. तिनेही प्रेयसी असल्याचे सांगितले. त्यामुळे दाेघांत वाद झाला. विक्कीने प्रेमसंबंधाची कबुली दिली. दगा दिल्यामुळे चिडलेल्या तरुणीने सदर पाेलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पाेलिसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली.