धुक्यांमुळे रेल्वेची गती मंदावली

-अनेक रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत -फॉग सेफ्टी वापरले जात असताना वेग कमी -उशिरा धावणार्‍या गाड्यांमुळे प्रवाशांना फटका

    दिनांक :02-Dec-2025
Total Views |
नागपूर,
Train speed : उत्तेरीकडील भागात थंडीचा कडाका वाढल्याने दाट धुक्यांमुळे रेल्वेची गती मंदावली आहे. दिल्ली व कोलकाता मार्गाने येणार्‍या अनेक रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. एकीकडे रेल्वेमध्ये धुक्याच्या वेळी सुरळीत वाहतुकीसाठी ’फॉग सेफ्टी डिव्हाइसेस’ किंवा ’फॉग पास’ वापरले जात असताना वेग कमी झाला आहे. जीपीएस-आधारित उपकरणे पायलटना दृश्यमानता कमी असतानाही सिग्नल, रेल्वेचे ठिकाण आणि इतर महत्त्वाच्या खुणांची रिअल-टाइम माहिती ऑडिओ-व्हिज्युअल पद्धतीने दिसते. यामुळे रेल्वेच्या पायलटना वेळेवर माहिती मिळते आणि रेल्वे उशिराने धावण्याचा किंवा अपघात होण्याचा धोका कमी होतो.
 
 

nagpur-railway.jpeg1 
 
 
नागपूर मार्गे धावणार्‍या रेल्वे विलंबाने
 
 
मध्य रेल्वेसारख्या विभागांनी धुक्याच्या काळात रेल्वेचा वाढवण्यासाठी ही यंत्रणा बसवली आहे. धुक्यानेही रेल्वे ट्रॅकवर आपली चादर पसरवल्याने अनेक गाड्या रेंगाळल्या आहेत. दरम्यान, काही गाड्या नागपूर मार्गे विलंबाने धावत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. तर दुसरीकडे गाड्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांची गर्दीही वाढली आहे.
 
 
मध्यवर्ती नागपूर रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या प्रतिक्षेत असलेल्या प्रवाशांना थंडीचा कडाका सहण करावा लागतो. आठ दिवसांपासून बोचर्‍या थंडीत प्रवासाला निघण्याचा अनेकांना कंटाळा येतो. मात्र, विवाह कार्यक्रमासह अत्यावश्यक कामामुळे अनेकांना प्रवास करावा लागतो. पूर्वीपासूनच प्रवासाचा बेत आखल्यामुळे नागरिक प्रवासाला निघत आहे. दुसरीकडे कडाक्याच्या थंडीमुळे धुक्याने रेल्वेगाड्या विलंबाने धावत आहे.
 
खबरदारीचा उपाय म्हणून गाड्यांचा वेग कमी
’फॉग सेफ्टी डिव्हाइसेस’ किंवा ’फॉग पास’ वापरले जात असताना पायलटला धुक्यामुळे स्पष्ट दिसत नसल्याने गाड्यांचा वेग मंदावला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून लोको पायलटला गाड्या सुरक्षित चालविण्यासाठी कमी वेगाने गाड्या चालविण्याशिवाय पर्याय नसल्याची प्रतिक्रिया रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली आहे. रेल्वे गाड्या विलंबाने धावत आहेत. मात्र काही मार्गावर धुक्यांचे प्रमाण जास्त असल्याने वेग कमी करण्याशिवाय पर्याय नसतो. एका रेल्वेमुळे त्यामागे अनेक रेल्वे गाड्यांना फटका बसतो. प्रामुख्याने गत काही दिवसांपासून विलंबाने धावत असलेल्या गाड्यांमध्ये १२९५० पोरबंदर कवी गुरू एक्स्प्रेस - ११ तास, २२८१५ एर्नाकुलम एक्स्प्रेस - १० तास, ०११५० संत्रागाछी २ तास ४० मिनिटे, ०३२५१ बंगळुरू एक्स्प्रेस - ९ तास १५ मिनिटे, ०११५० ठाणे स्पेशल - ९ तास ४० मिनिटे, पुरी एसएफ एक्स्प्रेस - २ तास ३० मिनिटे, १८०३० मुंबई एलटीटी एक्स्प्रेस - ७ तास १५ मिनिटे, १२१३० आझाद हिंद एक्स्प्रेस - ७ तास, १२२६२ मुंबई सीएसएमटी दुरंतो एक्स्प्रेस - ६ तास, ०३२४२ दानापूर स्पेशल फेअर - ६ तास विलंबाने आली. सोमवार नंतर मंगळवारी सुध्दरा नागपूर रेल्वे स्थानकांवर १८ विलंबाने पोहोचल्या. याशिवाय ०३२४२ दानापूर स्पेशल फेअर, २०४९३ चंडीगड सुपरफास्ट एक्स्प्रेस, ०११४० नागपूर स्पेशल फेअर एक्स्प्रेस, २२५३३ यशवंतपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस, १२८३४ अहमदाबाद एसएफ एक्स्प्रेस, १२८८० मुंबई एलटीटी एसएफ एक्स्प्रेस आदींचा समावेश आहे.