तभा वृत्तसेवा
राळेगाव,
vaddona-bazaar : लालानी जिनिंग अँड प्रेसिंगमध्ये 1 डिसेंबरला सीसीआयचे कापूस संकलन केंद्र सुरू झाले. यावेळी वजन-काट्याच्या पूजनानंतर कापूस खरेदी सुरू करण्यात आली. सीसीआयकडून सुरुवातीची कापूस गाडी 8 हजार 60 रुपये प्रतिक्विंटल या दराने लागली. यावेळी जिनिंगचे संचालक सलीम लालानी तसेच सीसीआयचे अधिकारी राजकुमार बैरवा व परिसरातील शेतकरी अडते ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
यावेळी प्रामुख्याने शेरअली बापू लालानी, किशोर कांडूरवार, शेख अजमुद्दीन, प्रकाश पोपट, खविसं संचालक दिनेश ठाकरे, वाढोणाबाजार उपसरपंच योगेश देवतळे, अमोल सोनटक्के, प्रवीण धूपे, सिनू नेलकृती, मापारी राजेंद्र आडे, गणेश बेहरे, प्रकाश जांभुळकर, हेमंत मासुरकर, चिंतामण शेंडे, संगम पेंदोर, इसराइल पठाण तसेच परिसरातील इतर शेतकरी उपस्थित होते.