तभा वृत्तसेवा
पुसद,
world-aids-day : जागतिक एड्स दिनानिमित्त पुसद शहरात उपजिल्हा रुग्णालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय पुसद आणि रोटरी क्लब पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच शहरातील विविध महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांच्या सहभागातून भव्य जनजागृती प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. अडथळ्यांवर मात करू, एकजुटीने एचआयव्ही-एड्सला लढा देऊ, नव परिवर्तन घडवू, मतदारराजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, अशा प्रभावी घोषणांनी संपूर्ण पुसद शहर दुमदुमून गेले.
प्रभातफेरीलल यशवंत रंगमंदिर येथून उपविभागीय अधिकारी अशिष बिजवल, सहायक गटविकास अधिकारी संजय राठोड, शहर पोलिस निरीक्षक सेवानंद वानखेडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रीती दास, रोटरी क्लब पुसदचे राम पद्मावार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मिलन भेलोंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव सरकुंडे डॉ. आशिष कदम, डॉ. मनीष देशमुख, डॉ. राकेश इंगळे, तसेच केंद्र समन्वयक देवानंद मोहिते यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जागतिक एड्स दिनानिमित्त सर्व सहभागी विद्यार्थ्यांना व उपस्थितांना शपथ देण्यात आली.
या प्रभातफेरीत वसंतराव नाईक महाविद्यालय, दूध तंत्रज्ञान महाविद्यालय वरुड, श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालय, परिचारिका प्रशिक्षण विद्यालय (उपजिल्हा रुग्णालय पुसद), बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय, फार्मसी महाविद्यालय, तसेच जीवन ज्योती एड्स प्रतिबंध व प्रबोधन संस्था, विहान प्रकल्प, टी.आय. प्रकल्प, आणि एनजीओ प्रकल्प पुसद यांसारख्या संस्थांचे विद्यार्थी, रेड रिबन क्लब, एनएसएस, व एनसीसी स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यशवंत रंगमंदिर मुखरे चौक, नाईक चौक, रामनगर, सेवालाल चौक, उपजिल्हा रुग्णालय या मार्गावर प्रभातफेरी निघाली असून, विविध ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून एचआयव्ही, एड्स तसेच मतदार जनजागृतीचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. या उपक्रमात पंकज वानखेडे, रवी कोल्हे, विना देशपांडे, रमेश फोले, रवीकिरण चंदनशे, सुमेध इंगोले, संजय गोदमले, प्रिया नगराळे, संगीता गजभिये यांनी परिश्रम घेतले.