यवतमाळ जिल्ह्यातील निवडणुकीत उत्साही मतदान

जिल्हाधिकारी विकास मीना यांची मतदान केंद्रांना धडक तपासणी

    दिनांक :02-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा,
यवतमाळ
yavatmal-elections : नगर परिषद व नगर पंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विकास मीना यांनी नेर, दारव्हा, वणी आदी निवडणूक क्षेत्रातील मतदान केंद्रांना भेट देत तेथील सर्वांगीण व्यवस्थेचा आढावा घेतला. निवडणूक सुरळीत, शांततेत व पारदर्शकपणे पार पडावी, यासाठी त्यांनी मतदान केंद्रांवरील सुविधा, सुरक्षाव्यवस्था, दिव्यांगांसाठी सोयी, ईव्हीएमची स्थिती यांची तपासणी केली आणि मतदान कर्मचाऱ्यांशी संवाद साधून आवश्यक सूचना केल्या.
 

ytl election 
 
 
नेर : 3.30 वाजेपर्यंत 46.78% मतदान
 
नेर नगर परिषदेतील 31 मतदान केंद्रांवर दुपारी 3.30 पर्यंत 12,317 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
एकूण मतदारसंख्या 26,328, त्यात 13,120 पुरुष आणि 13,208 महिला.
अध्यक्षपदासाठी 5 उमेदवार, तर 21 नगरसेवकांसाठी 87 उमेदवार रिंगणात आहेत.
मतमोजणीची तारीख आता 21 डिसेंबर निश्चित.
 
विशेष आकर्षण :
 
ytl election
 
 
नववधू कोमल रवींद्र संगेवार हिने बोहल्यावर चढण्यापूर्वी प्रभाग 5 मध्ये मतदान करून लोकशाहीचा आदर्श ठेवला.
 
वणी : 3.30 वाजेपर्यंत 46.85% मतदान
 
 
वणी शहरातील 62 केंद्रांवर 3.30 पर्यंत 23,225 मतदारांनी मतदान केले.
एकूण मतदार - 49,571 (पुरुष 24,607 / महिला 24,964).
अध्यक्षपदासाठी 7 उमेदवार, तर 28 नगरसेवकांसाठी 149 उमेदवारांचे रिंगण.
प्रभाग 14 मधील क गटाची निवडणूक 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली.
दिवसभर सुरळीत मतदान सुरू होते; एकूण मतदान 60% च्या आसपास जाईल असा अंदाज.
 
दारव्हा : 95 वर्षीय कमलाबाईंचा मतदानाचा उत्साह
 
 

ytl election 
 
दारव्हा नगर परिषद निवडणुकीत वयोवृद्ध व दिव्यांग मतदारही मोठ्या संख्येने मतदानासाठी आले.
 
विशेष उल्लेखनीय : 95 वर्षांच्या कमलाबाई काशीकर यांनी मतदान करून तरुणांनाही प्रेरणा दिली.