तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
kirtan-festival : कीर्तन महोत्सव समितीद्वारा आयोजित 18 व्या कीर्तन महोत्सवाचा भूमिपूजन व ध्वजारोहण सोहळा शिवाजी नगर प्रांगणात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.या सोहळ्याचे पौरोहित्य अभिषेक शास्त्री यांनी केले. पूजेचे यजमान पद सुरेश कैपिल्यवार व सुधा कैपिल्यवार यांनी भूषविले.
अध्यात्मिक क्षेत्रात यवतमाळ नगरीचे भूषण असलेल्या 18 व्या कीर्तन महोत्सवात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचा सहभाग एक भक्तीमय पर्वणी ठरणार असून, 7 डिसेंबर रोजी नुपूर चैतव्य देशपांडे, नागपूर, 8 रोजी जगन्नाथ महाराज पाटील ठाणे, 9 रोजी वेदश्री सुहाम जोशी, सांगली, 10 रोजी केदार यशवंत आठवले. कोकण, 11 रोजी संज्योत संजय केतकर, 12 रोजी प्रभंजन चारुदत्त भगत शिर्डी, व 13 रोजी ज्ञानेश जोशी धानोरकर, लातूर यांची कीर्तन सेवा सादर होणार आहे. सचिन वालगुंजे व चंद्रकांत राठोड यांची साथ संगत लाभणार आहे.
या प्रसंगी महोत्सव समितीचे सचिव अरुण भिसे, सहसचिव डॉ. सुशील बत्तलवार, सदस्य विनोद देशपांडे, अरूंधती भिसे, बाळासाहेब सज्जनवार, मोहन भुजाडे, दिलीप मादेशवार, ज्ञानेश्वर सुरजुसे, सुधाकर कापसे, सतीष राठोड, रवींद्र बाभूळकर, अशोक सिंघानिया, रवींद्र ढगे, संतोष डोमाळे, प्रवीण पाटील, रमेश भांदककर, बंसीलाल छत्ताणी, अनिल कट्यारमल, चंद्रशेखर देशपांडे, आशू खरतडे, चंद्रशेखर चौधरी, चंद्रकांत रेवणशेटे, राजेंद्र डांगे, आशिष भिसे, श्रीकांत मुनगिलवार, मीनल पांडे, प्रभाकर होरे, श्रीधर देशपांडे, प्राची बनगिनवार, प्रशांत बनगिनवार, रवी श्रीराव, सचिन बंगाले यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
7 ते 13 डिसेंबर दरम्यान सादर होणाèया कीर्तनाचा लाभ यवतमाळकरांनी घ्यावा, असे आवाहन कीर्तन महोत्सव समितीद्वारे करण्यात आले आहे.