हृदयद्रावक! अभिनेता विल्यम रश यांचे ३१ व्या वर्षी निधन

    दिनांक :20-Dec-2025
Total Views |
कैलिफोर्निया,
William Rush death news, हॉलिवूड इंडस्ट्रीममध्ये एका दु:खद बातमीने सर्वांनाच हादरवले आहे. प्रसिद्ध अभिनेता विल्यम रश यांचे ३१ व्या वर्षी अचानक निधन झाले. त्यांच्या या अचानक निधनाने चाहत्यांमध्ये आणि मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे.
 

William Rush death news, 
विल्यम रश William Rush death news, यांच्या निधनाची माहिती त्यांच्या सुपरस्टार आई, अभिनेत्री डेबी रश यांनी इन्स्टाग्रामवर पोस्टद्वारे दिली. त्यांनी चाहत्यांसोबत मुलाच्या निधनाचे दुःख शेअर करत, त्यांना श्रद्धांजली वाहिली. डेबीने पोस्टमध्ये म्हटले की, “आमचा प्रिय मुलगा विल्यम याचे १७ डिसेंबर रोजी निधन झाले. आमचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. आमचे खोल दुःख शब्दात व्यक्त करता येत नाही. आमच्या सर्वात कठीण काळातही, विल्यमने आम्हाला सर्वात मौल्यवान भेट दिली. त्यांचे अवयव दान करून त्यांनी इतर कुटुंबांना आशा आणि जीवन दिले. त्यांची दया आणि प्रेम कायमचे आमच्या वारशाचा भाग राहील. या कठीण काळात आमच्यासाठी प्रार्थना करण्याची आम्ही तुम्हाला विनंती करतो. विल्यम नेहमीच लक्षात राहील.”
विल्यम रशने आपल्या कारकिर्दीची सुरुवात टीव्ही मालिकेतून केली होती. वॉटरलू रोड या मालिकेतील जोश स्टीव्हनसनची भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले. २०१६ मध्ये त्यांनी द एक्स फॅक्टर या शोसाठी ऑडिशन दिले. त्यांची आई, डेबी रश, हॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असून *कोरोनेशन स्ट्रीट मध्ये एका दशकापर्यंत काम केले आहे. विल्यम देखील या मालिकेत दिसले होते.विल्यम रश यांच्या निधनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि आठवणी शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. त्यांच्या लहान वयात झालेल्या निधनाने चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये मोठा शोककळा निर्माण झाली आहे.