मुंबई,
4500 rupees will be credited to the account राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच लाडक्या बहिणींच्या खात्यात मोठी रक्कम जमा होण्याची शक्यता असून सरकारकडून तीन हप्ते एकत्र देण्याची तयारी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पुढील आठवड्यात लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे. त्यानंतर मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे दोन हप्तेही देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे काही लाभार्थी महिलांना एकूण ४५०० रुपयांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. तर काहींना परिस्थितीनुसार एक किंवा दोन हप्त्यांची रक्कम म्हणजेच २१०० रुपये मिळू शकतात.

दरम्यान, डिसेंबर अखेरीस जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार असल्याने प्रशासनाकडून लाभ वितरण प्रक्रियेला गती देण्यात येत आहे. निवडणुकीमुळे योजनेतील ई-केवायसी प्रक्रियेसाठी दिलेली अंतिम मुदतही पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ई-केवायसीसाठी महिलांना आणखी एका महिन्याची मुदतवाढ देण्याचा विचार सुरू आहे. एकूणच, नवीन वर्ष आणि मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो लाडक्या बहिणींना आर्थिक दिलासा मिळणार असून या योजनेमुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.