अमरावती,
vote-counting : जिल्ह्यातल्या १० नगरपरिषद व २ नगरपंचायतच्या निवडणुकीची मतमोजणी रविवारी सकाळी ८.३० वाजतापासून वेगवेगळ्या१२ ठिकाणी सुरू होईल. नवे १२ अध्यक्ष व २७८ सदस्य मतमोजणीअंती विजयी घोषीत होणार आहे. सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दुपारी १२ पर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल.

अचलपूर येथे नगराध्यक्षासह ४१ सदस्यांसाठी निवडणूक झाली. येथील मतमोजणी कल्याण मंडपम् येथे होणार असून १२ टेबलवर २० फेर्या होतील. ३६ कर्मचारी राहणार आहे. अंजनगाव सुर्जी येथे नगराध्यक्षासह २८ सदस्यांसाठी निवडणूक झाली. येथील मतमोजणी न. प. सभागृहात होणार असून १० टेबलवर ६ फेर्या होतील. ४० कर्मचारी राहणार आहे. दर्यापूर येथे नगराध्यक्षासह २५ सदस्यांसाठी निवडणूक झाली. येथील मतमोजणी नगरपरिषद सभागृहात होणार आहे. ६ टेबलवर ७ फेर्या होतील. ३५ कर्मचारी राहणार आहे. वरूड येथे नगराध्यक्षासह २६ सदस्यांसाठी निवडणूक झाली. येथील मतमोजणी सांस्कृतीक भवन येथे होणार असून १४ टेबलवर ४ फेर्या होतील. ३६ कर्मचारी राहणार आहे. चांदूर रेल्वे येथे नगराध्यक्षासह २० सदस्यांसाठी निवडणूक झाली. येथील मतमोजणी तहसील कार्यालयात होणार असून ७ टेबलवर ८ फेर्या होतील. २८ कर्मचारी राहणार आहे. चिखलदरा येथे नगराध्यक्षासह २० सदस्यांसाठी निवडणूक झाली. येथील मतमोजणी पालिका भवनात होणार असून २ टेबलवर ५ फेर्या होतील. ४ कर्मचारी राहणार आहे.
चांदूर बाजार येथे नगराध्यक्षासह २० सदस्यांसाठी निवडणूक झाली. येथील मतमोजणी नगरपरिषद टाऊन हॉल येथे होणार असून ६ टेबलवर ६ फेर्या होतील. २४ कर्मचारी राहणार आहे. शेंदूरजना घाट येथे नगराध्यक्षासह २० सदस्यांसाठी निवडणूक झाली. येथील मतमोजणी कम्युनिटी हॉल येथे होणार असून ७ टेबलवर ३ फेर्या होतील. २३ कर्मचारी राहणार आहे. धामणगाव रेल्वे येथे नगराध्यक्षासह २० सदस्यांसाठी निवडणूक झाली. येथील मतमोजणी तहसील कार्यालयात होणार असून ७ टेबलवर ३ फेर्या होतील. २१ कर्मचारी राहणार आहे. मोर्शी येथे नगराध्यक्षासह २४ सदस्यांसाठी निवडणूक झाली. येथील मतमोजणी तहसील कार्यालयात होणार असून १२ टेबलवर ४ फेर्या होतील. २६ कर्मचारी राहणार आहे. नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत येथे नगराध्यक्षासह १७ सदस्यांसाठी निवडणूक झाली. येथील मतमोजणी आयटीआय हॉलमध्ये होणार असून ६ टेबलवर ३ फेर्या होतील. ३० कर्मचारी राहणार आहे. धारणी येथे नगराध्यक्षासह १७ सदस्यांसाठी निवडणूक झाली. येथील मतमोजणी नवनी प्रशासकीय इमारतीत होईल. ४ टेबलवर ५ फेर्या होतील. १६ कर्मचारी राहणार आहे.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
सर्वच मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे. ६ उपविभागीय अधिकारी, १०७ पोलिस अधीकारी, ८९३ पोलिस अंमलदार व ७४ वाहतूक अंमलदार, ६०० होमगार्ड व १ एसआरपीएफ कंपनी यांची नेमणूक करण्यात आली आहे.