नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचा मोठा विजय

    दिनांक :20-Dec-2025
Total Views |
नागपूर,
Chandrashekhar Bawankule राज्यातील नगरपरिषदांसह नगरपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया जोरात सुरु असून, 24 नगरपरिषदांसाठी आज मतदान सुरू झाले. रविवारी (दि. 20) मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.
 

BJP, Nagpur municipal elections, Chandrashekhar Bawankule 
बावनकुळे म्हणाले, “उद्याचा निकाल भाजपा आणि महायुतीसाठी विजयाचा दिवस असेल. भाजपाला कधी मिळालं नाही एवढं यश नगरपरिषद निवडणुकीत मिळणार आहे. जिथे आम्ही कधीच जिंकलो नव्हतो, त्या नगरपालिका ही आम्ही जिंकणार आहोत. प्रचारामध्ये आम्ही पाहिलं की मतदारांचा कल भाजपच्या बाजूने आहे, त्यामुळे मोठा विजय निश्चित होईल.”महायुती संदर्भात बावनकुळे म्हणाले, “महायुती आम्ही करत आहोत, मात्र खूप मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी अपेक्षा ठेवलेल्या आहेत. त्यामुळे सर्वांना संधी मिळू शकत नाही. काही ठिकाणी राष्ट्रवादी वेगळी लढेल, परंतु मैत्रीपूर्ण लढत होईल आणि कटूता निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाईल.”
 
 
मुंबईतील Chandrashekhar Bawankule महायुती निर्णयाबाबत बावनकुळे म्हणाले की, “दोन दिवसांच्या आत मुंबईतील भाजप आणि शिवसेनेची कोअर कमिटी बसून अंतिम निर्णय करेल. पहिल्या टप्प्यात दोन्ही पक्षांचे मेंबर चर्चा करत आहेत. जिथे जागा कमी आणि दावेदार जास्त आहेत, तिथे काही अडचणी आहेत, मात्र अंतिम निर्णय अजित पवार घेणार आहेत. त्यामुळे याबाबत आम्ही काहीही बोलू शकत नाही.”पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये इतर पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाजपमध्ये सामील होत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. त्यांनी विश्वास व्यक्त केला की या भागांमध्येही भाजपचा महापौर होईल.