कोपरगाव मतदान केंद्रावर बाचाबाची, पोलिसांनी हस्तक्षेप

    दिनांक :20-Dec-2025
Total Views |
कोपरगाव,
Controversy at Kopargaon polling station राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसह विविध जिल्ह्यांतील 143 सदस्यपदांसाठी आज (20 डिसेंबर) मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान सुरू राहणार आहे. मात्र, मतदानाच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी तणावाची घटना समोर आली आहे. नांदेडच्या धर्माबादमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांवर मतदारांना प्रलोभन देऊन मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा आरोप केला जात आहे. मतदारांनी सांगितले की इराणी मंगल कार्यालयात मतदान करू नका, असा दबाव भाजपकडून होता. घटनास्थळी पोलिस तात्काळ दाखल झाले, परंतु कोणताही भांडणात्मक प्रकार घडला नाही.
 
 
Controversy at Kopargaon polling station
तसेच, अहिल्यानगरमधील कोपरगाव मतदान केंद्रावरही गोंधळाची घटना घडली. येथे भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिनिधींमध्ये बाचाबाची झाली आणि मतदारांवर दबाव आणल्याचा आरोप दोन्ही पक्षांनी एकमेकांवर केला. पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही पक्षांना मतदान केंद्रापासून दूर केले, तरीही मतदार प्रतिनिधी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे दिसून आले.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील प्रभाग क्रमांक 11 बी मधील अहिल्यादेवी कन्या विद्यालयातील मतदान केंद्रावरही पोलिस आणि निवडणूक कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. स्ट्रॉंगरूममधून ईव्हीएम मशीन व मतदान साहित्य केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी खाजगी वाहनाचा वापर केल्यावर पोलिसांनी कर्मचाऱ्यांना अडवले, त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला. आज मतदान होणाऱ्या 23 पालिका व पंचायतींमध्ये अंबरनाथ, कोपरगाव, देवळाली-प्रवरा, पाथर्डी, नेवासा, बारामती, फुरसुंगी-उरुळी देवाची, अनगर, मंगळवेढा, महाबळेश्वर, फलटण, फुलंब्री, मुखेड, धर्माबाद, निलंगा, रेणापूर, वसमत, अंजनगाव सूर्जी, बाळापूर, यवतमाळ, वाशिम, देऊळगावराजा, देवळी व घुग्घूस यांचा समावेश आहे.