डॉ. पुसदकर यांचा अग्निकर्म व विद्यकर्म मार्गदर्शन

    दिनांक :20-Dec-2025
Total Views |
नागपूर,
Dr. Pusadkar आयुर्वेद शास्त्रामध्ये वेदना, सांधेदुखी आणि जुनाट आजारांवर प्रभावी ठरणाऱ्या अग्निकर्म आणि विद्यकर्म उपचार पद्धतींचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. विश्वकुंभ आयुर्वेद चिकित्सालयाचे संचालक व सुप्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. संतोष सूर्यकांत पुसदकर यांनी या उपचार पद्धतींचे फायदे स्पष्ट केले. डॉ. पुसदकर म्हणाले की, अग्निकर्म ही उष्णतेच्या साहाय्याने केली जाणारी उपचार पद्धत आहे. गुडघेदुखी, कंबरदुखी, मणक्यांचे आजार, सायटिका, टाचदुखी तसेच स्नायूंच्या वेदनांमध्ये ही पद्धत अत्यंत उपयुक्त ठरते. या उपचारामुळे वेदना तत्काळ कमी होतात आणि औषधांवरील अवलंबनही कमी होते.

Dr. Pusadkar
त्याचप्रमाणे, विद्यकर्म ही सूक्ष्म चिराद्वारे केली जाणारी आयुर्वेदीय पद्धत असून, रक्तदोष, सूज, गाठ, शिरांचे विकार तसेच काही त्वचारोगांमध्ये लाभदायक ठरते. ही प्रक्रिया सुरक्षित, कमी खर्चिक आणि दुष्परिणामविरहित असल्याचे डॉ. पुसदकर यांनी नमूद केले. डॉ. पुसदकर म्हणाले की, आधुनिक जीवनशैलीमुळे वाढत असलेल्या वेदनादायक आजारांवर आयुर्वेदिक पद्धतीने शाश्वत उपाय मिळू शकतो. Dr. Pusadkar योग्य निदान आणि अनुभवी वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निकर्म व विद्यकर्म केल्यास रुग्णांना दीर्घकालीन आराम मिळतो, असेही त्यांनी नागरिकांना सांगितले आणि आयुर्वेदाकडे वळण्याचे आवाहन केले.
सौजन्य: सारंग टोपरे, संपर्क मित्र