जलाशयावर विदेशी पक्ष्यांचे आगमन

-स्थलांतरित पक्ष्यांच्या संवर्धनाची गरज -स्थानिक पक्षीशास्त्रज्ञ, संशोधकांची मागणी

    दिनांक :20-Dec-2025
Total Views |
नागपूर,
foreign-birds : बार-हेडेड हंस हे स्थलांतरित पक्षी मंगोलिया आणि सायबेरियातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून भारतात येतात, विशेषतः विदर्भासह दक्षिण भारतात हे हिवाळ्यातच दिसून येतात. मुख्यत: हवामानातील बदल, स्थलांतराच्या मार्गातील चक्रीवादळे, दीर्घकाळ झालेला मुसळधार पाऊस यामुळे हे पक्षी नागपूरच्या परिसरात साधारण दीड ते दोन महिने उशिरा आले आहेत.
 

NGP 
 
 
विविध तलावांवर विदेशी पक्षी
 
 
नागपूर शहराच्या परिसरातील विविध तलावांवर बार-हेडेड गूस (पट्टकादंब), नॉर्दर्न पिनटेल (तलवार रेड-क्रेस्टेड पोचार्ड (लालसरी), कॉटन पिग्मी गूस (नदी सुरी), व्हिसलिंग डक (शिटी बदक), फेरुगिनस डक (लोहसरी) आणि इतर पाणपक्षी दाखल झाले आहेत. जलचरांव्यतिरिक्त इतर हिवाळी स्थलांतरित पक्षीही नागपूर जिल्ह्याच्या परिसरात दिसून येत असल्याची माहिती पक्षीशास्त्रज्ञ, संशोधक अविनाश लोंढे यांनी दिली आहे.
 
तलाव पुनरुज्जीवित करण्याची गरज
 
 
स्थलांतरित पक्ष्यांच्या संवर्धनासाठी स्थानिक जैवविविधता व्यवस्थापन समितीने पुढाकार घेण्याची गरज आहे. या समितीचे महानगरपालिका आयुक्त असताना त्यांनी अद्याप एकही बैठक घेतलेली नाही. तत्कालीन आयुक्त विमला राव यांनी नागपूर वनविभागाच्या १४ परिक्षेत्रांतील प्रत्येकी १ तलाव पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्यानंतर प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. या पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील प्रमुख तलावांचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक झाले आहे. तसेच पक्ष्यांच्या संवर्धनासाठी पावले उचलणे व जनजागृती करणे ही काळाची गरज झाली आहे.
 
समृद्ध जैवविविधता वाचविणे आवश्यक
 
 
स्थलांतरित पक्ष्यांच्या संवर्धनासाठी पुढील १-२ वर्षांत ठोस निर्णय न घेतल्यास पाणथळ जागी असणारी समृद्ध जैवविविधता नक्कीच गमावून बसण्याची वेळ येणार आहे. तसेच पुढच्या पिढीला हे पक्षी केवळ पाठयपुस्तकातील चित्रे आणि फोटोंमध्येच बघण्याची वेळ येणार असल्याचा पक्षीशास्त्रज्ञ, शासकीय विज्ञान संस्थेचे प्रा. जगदीश बोरकर यांनी दिला आहे.
 
पक्षी अभ्यासकांसाठी पर्वणी
 
हिवाळ्यात स्थलांतर करून येणारे पक्षी समूहाने येण्यास सुरूवात झाली आहे. यात कलहंस हा पक्षीसुद्धा समूहाने, पण प्रामुख्याने बार हेडेड या पक्ष्याच्या थव्यांच्या मागे समूहाने येतो. विदर्भातील नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या तलावसंपन्न जिल्ह्यातील तलावांवर हिवाळ्यात विविध पक्ष्यांचे स्थलांतरण म्हणजे पक्षी अभ्यासकांसाठी पर्वणी असते.
 
२८ हजार फूट उंचीवर उडणारे हे पक्षी
 
सुरक्षित अधिवास म्हणून हजारों मैल प्रवास करत विविध प्रजातीचे पक्षी येथे येतात. तलाव,पाणवठयांवर बार हेडेड गुज ( राजहंस) हा युरोपियन पक्षी आहे. सुमारे साडे चार हजार किमी प्रवास करत ते जिल्ह्यातील विविध तलावांवर दाखल जगात सर्वात उंचीवरून उडणारा पक्षी अशी बार हेडेड गुज पक्ष्याची ओळख आहे. हिमालय पर्वता एवढ्या म्हणजेच २८ हजार फूट उंचीवर उडणारे हे पक्षी आहेत. हे पक्षी हिमालयातून, तिबेट, कझाकस्तान, रशिया आणि मंगोलियामार्गे उडतात. मार्चच्या शेवटी आणि उन्हाळ्याच्या सुरूवातीस परत जातात.