सुवर्ण संधी! भारतीय हवामानशास्त्र विभागात 134 पदांसाठी भरती

पगार 29 हजार ते 1.23 लाख रुपये

    दिनांक :20-Dec-2025
Total Views |
मुंबई,
Indian Meteorological Department jobs सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागात (IMD) विविध पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. 

Indian Meteorological Department jobs 
 
 
या भरतीत एकूण १३४ पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. यात प्रोजेक्ट सायंटिस्ट, सायंटिफिक असिस्टंट आणि अॅडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट यांचा समावेश आहे. या पदांसाठी उमेदवारांनी बी.टेक/बी.ई./एम.एससी./एम.ई./एम.टेक., बी.एससी., बी.ए. अशी शैक्षणिक पात्रता असावी लागते. तसेच भौतिकशास्त्र, गणित, अंतराळशास्त्र, वातावरणीय विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन्समध्ये किमान ६०% गुण आवश्यक आहेत.
 
विभागाच्या Indian Meteorological Department jobs भरतीसाठी उमेदवारांची वयोमर्यादा ३० ते ५० वर्षांदरम्यान ठेवण्यात आली आहे. वेतनही पदानिहाय ठरवले आहे; महागड्या पदांसाठी पगार दरमहा २९,००० ते १,२३,१०० रुपये असून, याशिवाय HRA (हाऊस रेंट अलाउन्स) देखील मिळणार आहे.
 
निवड प्रक्रिया लेखी परीक्षा न करता केली जाणार आहे. सर्वप्रथम अर्ज शॉर्टलिस्ट केले जातील, त्यानंतर उमेदवारांची मुलाखत होईल. मुलाखतीत मिळालेल्या गुणांवरून मेरिट तयार केली जाईल आणि निवड झालेल्या उमेदवारांना ट्रेनिंग दिल्यानंतर विविध ठिकाणी पोस्टिंग केली जाईल.IMD मध्ये नोकरीची ही संधी विज्ञान, हवामानशास्त्र व प्रशासनातील करिअरसाठी मोठा पाऊल ठरू शकते. इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करणे गरजेचे आहे, कारण अर्जांची अंतिम तारीख ४ डिसेंबर २०२५ आहे.