ढाका,
India's concerns have increased बांगलादेशमध्ये उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर सुरू असलेल्या हिंसाचारामुळे स्थिती तणावपूर्ण झाली आहे. शुक्रवारी रात्री काही कार्यालयांची फोडफाट झाली असून, आज हादी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर हिंसाचार पुन्हा भडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेने बांगलादेशमधील त्यांच्या नागरिकांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी निदर्शनांपासून आणि गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहण्याचा, शक्यतो घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. अंत्यसंस्काराच्या पारंपारिक मार्गावर प्रवास करताना अडचणी येऊ शकतात आणि शांततामय सभेतदेखील हिंसाचार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ढाकासह आसपासच्या भागात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असून, नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

बांगलादेशच्या राजधानी ढाकामध्ये आज हादी यांचे अंत्यसंस्कार होत आहेत. त्यापूर्वी नमाज अदा केली जाईल. हादी यांच्या मृत्यूनंतर सरकारने एक दिवसाचा राजकीय शोक जाहीर केला आहे आणि अधिकाधिक नागरिकांनी अंत्यसंस्कारात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. यापूर्वी काही कट्टरपंथी इस्लामी संघटनांकडून हिंदूंचा छळ, देवतांची विटंबना आणि महिलांवर छेडछाड झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा हिंसक वातावरणामुळे शेजारच्या भारतातही चिंता वाढली आहे. प्रशासन आणि आंतरराष्ट्रीय समुदाय नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत आहेत आणि स्थानिक माध्यमांवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे.