बिबट्याचा इसमावर हल्ला

पोफाळी परिसरात दहशतीचे सावट

    दिनांक :20-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
उमरखेड,
Leopard attack Pofali तालुक्यातील पोफाळी परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोफाळी येथील रहिवासी शंकर ज्ञानबा खंदारे यांच्यावर कळमुला नाल्याजवळ संध्याकाळी चार ते पाचच्या सुमारास बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
 

Leopard attack Pofali  
सध्या पाण्याच्या शोधात जंगलातील वन्यजीव गावात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पोफाळी, कळमुला, अंबाळी, जनुना, पळशी, नागापूर, नागवाडी, पाथरवाडी, शेनंद, सावरगाव (बंगला), धनज, मोहदरी व तरोडा या गावांच्या शिवारात बिबट्याचा वावर असल्याची माहिती ग्रामस्थांकडून मिळत आहे. काही ठिकाणी जनावरांवर हल्ल्याच्या घटनाही घडल्याचे समोर आले आहे.
रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी शेतकèयांना रात्री उशिरापर्यंत शेतात जावे लागत असल्याने बिबट्याचा वावर शेतकèयांसाठी मोठा धोका ठरत आहे. पोफाळी गावाजवळ प्रत्यक्ष बिबट्याचे दर्शन झाल्याच्या चर्चांमुळे भीती अधिकच वाढली आहे.या पृष्ठभूमिवर वनविभागाने तातडीची दखल घेत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. रात्री एकट्याने बाहेर पडू नये, शेतात जाताना गटाने जावे, टॉर्च व काठीचा वापर करावा तसेच जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाकडून गस्त वाढविण्यात येणार असून, कोणतीही घटना किंवा दर्शनझाल्यास तत्काळ वनविभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.बिबट्याच्या दहशतीमुळे पोफाळी परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असून, वनविभागाने ठोस उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.
आमदार किसन वानखेडेंनी जखमी शंकर खंदारे यांची रुग्णालयात घेतली भेट
उमरखेड Leopard attack Pofali  तालुक्यातील पोफाळी येथे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शंकर ज्ञानबा खंदारे यांची उमरखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात आमदार किसन वानखेडे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी खंदारे यांच्या प्रकृतीची विचारपूस करून डॉक्टरांशी उपचाराबाबत माहिती घेतली. वनविभागाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात तसेच परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही आमदार वानखेडे यांनी दिल्या