पुढील काही दिवसपर्यंत थंडी कायम राहणार

-किमान तापमान ८.६ अंशांपर्यंत घसरले -सर्दी, खोकला, घसा दुखणे, ताप तसेच श्वसनाच्या तक्रारी

    दिनांक :20-Dec-2025
Total Views |
नागपूर,
nagpur-temperature : गत आठ दिवसांपासून हवामानात अचानक बदल जाणवत असून थंडीचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झाला आहे. दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री बोचरी थंडी असा दुहेरी अनुभव नागपूरकर घेत आहेत. सध्या शहरात कमाल तापमान २८.६ अंश सेल्सिअसदरम्यान असून, किमान तापमान ८.६ अंशांपर्यंत घसरले आहे. डिसेंबरच्या सुरुवातीपासूनच रात्रीचे तापमान एकल अंकी किंवा त्याच्या आसपास राहिल्याने थंडीचा प्रभाव अधिक जाणवू लागला आहे. पुढील दिवसपर्यंत थंडी कायम राहणार असल्याने काळजी घेण्याची गरज आहे.
 


COLD
 
 
वाढत्या प्रदूषणामुळे श्वसनाच्या तक्रारी
 
 
मुख्यत: बदलते हवामान आणि वातावरणातील धूळ, धुके व वाढते प्रदूषण यामुळे सर्दी, खोकला, घसा दुखणे, ताप तसेच श्वसनाच्या तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांना घसा खवखवणे, कोरडा खोकला, दम लागणे आणि अंगदुखीची जाणवत असल्याची माहिती डॉ. अजय काळे यांनी दिली आहे.
 
 
शासकीय वैद्यकीय रुग्णालय, महापालिकेचे दवाखाने तसेच खासगी दवाखान्यांच्या ओपीडीमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. वाढती थंडी, बिघडलेले हवामान आणि प्रदूषण यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढत आहे.
 
 
हवामानातील अचानक बदलांचा सर्वाधिक फटका लहान बालकांना बसत आहे. प्रतिकारशक्ती कमी असल्याने बालकांना सर्दी, खोकला, ताप श्वसनास त्रास होण्याची शक्यता अधिक असते. घरचे ताजे व पौष्टिक अन्न पदार्थ, सर्दी-खोकल्याची लक्षणे वाढत असल्यास स्वतःहून औषधे न देता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अशी सुचना डॉ.संजय सहारे यांनी केली आहे.