नवी दिल्ली,
PM-Kisan 22nd installment २०१९ मध्ये सुरू झालेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत २१ हप्त्यांमध्ये थेट ४.०९ लाख कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. या योजनेत शेतकऱ्यांना वार्षिक ६,००० रुपये लाभ मिळतो, जो तीन हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात हस्तांतरित केला जातो. अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो, तर जास्त उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही.
सध्या शेतकऱ्यांना PM-Kisan 22nd installment २२ व्या हप्त्याची उत्सुकतेने प्रतिक्षा आहे. या हप्त्याचे बँक खात्यात जमा होणे फेब्रुवारी २०२६ मध्ये होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या हप्त्यांच्या अंतराचा विचार करता, पुढील हप्ता जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो, असे अपेक्षित आहे. पीएम-किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर यासंबंधी अद्यतन वेळोवेळी दिले जाणार आहे.
२०२४ मध्ये PM-Kisan 22nd installment संसद समितीने योजनेची वार्षिक रक्कम ६,००० रुपयाऐवजी १२,००० रुपये करण्यात यावी, अशी सूचना दिली होती. मात्र शेतकरी कल्याण मंत्रालयाचे राज्य मंत्री रामनाथ ठाकूर यांनी स्पष्ट केले की, सध्या सरकारकडे रक्कम वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे सध्याची ६,००० रुपयांची वार्षिक रक्कम कायम राहणार आहे आणि ती वाढवण्याचा सध्या कोणताही विचार सुरू नाही.योजनेत फार्मर आयडीची अट नव्याने लागू करण्यात आली आहे. सध्या १४ राज्यांमध्ये फार्मर आयडी प्रक्रिया सुरू आहे. या राज्यांतील शेतकऱ्यांना पीएम-किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक आहे. तर ज्या राज्यात ही प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही, तिथल्या शेतकऱ्यांना यादीतून सवलत देण्यात आलेली आहे.सरकारने पीएम-किसान योजनेत सतत पारदर्शकता राखत शेतकऱ्यांना वेळोवेळी थेट लाभ पोहचवण्याचे आश्वासन दिले आहे. २२ व्या हप्त्याबाबतची प्रतीक्षा असले तरी, शेतकऱ्यांना सध्या दिलेल्या वार्षिक ६,००० रुपयांमधील लाभ कायम राहणार आहे.