‘ऑपरेशन लोटस’चा प्रभाव ,राष्ट्रवादीला भाजपकडून झटका

    दिनांक :20-Dec-2025
Total Views |
पुणे,
pune municipal election पुण्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना मोठा धक्का दिला आहे. मुंबईतील भाजपाच्या प्रदेश कार्यालयात आज आयोजित विशेष सोहळ्यात अनेक महत्त्वाच्या नेत्यांचा पक्षप्रवेश होणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण राहणार आहेत.
 
 

पुणे महानगर पालिका  
 
 
 
यात वडगाव शेरी मतदारसंघाचे आमदार बापू पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामील होत आहेत. त्याचसोबत अजित पवार गटातील माजी नगरसेवक विकास दांगट, बाळा धनकवडे, माजी नगरसेविका सायली वांजळे आणि रोहिणी चिमटे यांचा देखील समावेश आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष नारायण गलांडे, काँग्रेस व इतर पक्षातील एकूण बावीस माजी नगरसेवक आणि पदाधिकारी आज भाजपच्या झेंड्याखाली येणार आहेत.
 
ही हालचाल भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’चा भाग असून, अलीकडे पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार यांनी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेतले होते. आता पुण्यात भाजपने अजित पवार गटातील कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळवले आहे, ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना निवडणुकीपूर्वी मोठा फटका बसला आहे.
 
शुक्रवारी पुण्यात भाजपच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आज होणाऱ्या मेगा पक्षप्रवेशाची सविस्तर चर्चा झाली. पहिल्या टप्प्यात बावीस नेते भाजपमध्ये सामील होतील, तर त्यानंतर आणखी नेत्यांचा प्रवेश होईल; मात्र त्यांची नावे पक्षप्रवेशानंतरच जाहीर केली जाणार आहेत.
 
भाजपला या हालचालीमुळे पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा पक्ष नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.pune municipal election या पक्षप्रवेशामुळे शहरातील राजकीय समीकरणांमध्ये लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे, आणि विरोधी पक्षांना निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे.