कारंजा (घा.),
local-gurukul-public-school : स्थानिक गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये सप्तशती संगम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी योग प्रशिक्षक भारती पालीवाल होत्या तर नागपूर येथील विद्या भारती विदर्भ शिशु परिषद सदस्य सुमेधा खोत या प्रमुख वता म्हणून उपस्थित होत्या. मुख्याध्यापक आशिष मानकर, विद्या भारतीच्या सहसंयोजक स्वाती भोळे, अर्चना जैनाबादकर, विलास राजकारणे, गोपाल पालीवाल उपस्थित होते.

सुमेधा खोत यांनी कुटुंब प्रबोधन तसेच मीनाक्षी क्षीरसागर यांनी महिलांच्या भूमिका यावर मार्गदर्शन करताना आत्मबल, आत्मनिर्भरता, धैर्य, सहनशीलता, ज्ञान, नेतृत्व आणि करुणा या सप्तशतीचा सुंदर संगम म्हणजे आजची स्त्री आणि या स्त्री शक्तीचा गौरव करण्याकरिता हा सप्तशती कार्यक्रम असल्याचे सांगितले. प्रास्ताविक जयश्री चापले यांनी केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थिनींनी अनेक महान कार्य करणार्या महिलांच्या जसे राणी लक्ष्मीबाई, जिजामाता, सोफिया कुरेशी, सिंधूताई सपकाळ, सावित्रीबाई फुले आदींची वेशभूषा त्याचबरोबर वक्तृत्व सादरीकरण केले. माता पालकांसोबत भगवद्गीता उपनिषदे आदी विविध विषयावर प्रश्नोत्तरे झाली. उत्तर देणार्या माता पालकांना भेटवस्तू देऊन सन्मानित केले. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नारी ही कोमल नसून सशत आहे यावर सुंदर नृत्य सातवीच्या विद्यार्थिनींनी सादर केले. संचालन योगिता गुर्वे यांनी केले तर आभार अनामिका बोके यांनी मानले.