सिंदीत राणीचे राज्य येणार की सासू बाजी मारणार?

    दिनांक :20-Dec-2025
Total Views |
नरेंद्र सुरकार
सिंदीरेल्वे, 
municipal-council-election-result : नगर पालिका निवडणुकीकरिता कोणताही आक्षेप नसल्याने सार्वत्रिक निवडणूक २ डिसेंबरलाच संपली. मात्र, निकाल रविवार २१ रोजी दुपारपर्यंत लागण्याची चिन्ह आहेत. यंदा नगर परिषदेत राणीचे राज्य येणार की जुण्या जाणत्या सासूबाई बाजी मारणार एवढी उत्सुकता कायम आहे!
 

 KL 
 
 
वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक मतदान सिंदी रेल्वे येथे ७१.२२ टक्के झाले आहे. मागच्यावेळी ६७ टक्के मतदान झाले होते आणि भाजपाच्या संगीता शेंडे यांनी अडीच हजारांच्या फरकाने बाजी मारली होती. यंदाची वाढीव चार टयांचे मतदान कोणाला तारणार हे उद्याच स्पष्ट होईल.
 
 
 
यावेळी सहाही राजकीय पक्षांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाच्या २० जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. त्यामुळे ९८ उमेदवार भाग्य आजमावत आहेत. नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षातर्फे तेजस्वीनी उर्फ राणी कलोडे यांना तिकीट देण्यात आले तर त्यांच्या उमेदवारी आधीच शरद पवार गटाने माजी नगराध्यक्ष सुनीता गं. कलोडे यांची उमेदवारी जाहीर केली होती. राणी कलोडे उच्च शिक्षित असून त्यांचे सासरे देखील अनेक वर्ष नगरसेवक होते. सूनबाई राणी आणि सासू सुनीता कलोडे यांच्यातच तीव्र संघर्ष आहे. इतर उमेदवार नामधारी आहेत. कोणीही जिंकल्या तरी सत्ता कलोडे परिवारतच असेल यांत वाद नाही. यापूर्वी सन १९७८ मध्ये कोपरकर पिता-पुत्र आणि १९९६ मध्ये देवतळे कुटुंबातील दोन जावांमधील संघर्ष जनतेनी बघितला आहे.