मुंबई,
winter skincare आजकाल प्रत्येकाला मऊ आणि चमकदार त्वचा हवी असते. त्यासाठी लोक बाजारात उपलब्ध विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात, मात्र रासायनिक उत्पादनांमुळे अनेकदा त्वचेला साइड इफेक्ट्सही दिसू लागतात. त्वचेची खरी काळजी घेण्यासाठी सकाळ आणि रात्रीची नियमित दिनचर्या खूप महत्वाची आहे. अनेक लोक सकाळी चेहऱ्याची काळजी घेतात, पण रात्री झोपण्यापूर्वी त्वचेची काळजी सोडतात, जे त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते.
ड्राय (कोरड्या) त्वचेसाठी सुरुवात सौम्य आणि साबणरहित फेसवॉशने दिवसातून दोनदा चेहरा धुण्यापासून करावी. खूप गरम पाणी टाळावे, कारण ते त्वचेतील नैसर्गिक तेल काढून टाकते. चेहरा धुतल्यानंतर लगेच मॉइश्चरायझर लावणे गरजेचे आहे. यासाठी ग्लिसरीन, हायलुरॉनिक अॅसिड किंवा शिया बटर असलेले मॉइश्चरायझर चांगले ठरतात. रात्री झोपण्यापूर्वी जाड क्रीम लावल्यास त्वचेला खोलवर पोषण मिळते.सप्ताहातून एकदा सौम्य स्क्रब किंवा घरगुती फेसपॅक जसे की ओट्स-दही किंवा पपई-मध-मुलतानी मातीचा फेसपॅक वापरणे फायदेशीर ठरते. पपई, मध, लिंबाचा रस आणि मुलतानी मातीचा फेसपॅक शिफारस केला आहे. यासाठी पपईची पेस्ट, मध, लिंबाचा रस आणि मुलतानी माती चांगल्या प्रकारे मिसळून तयार करावा. चेहरा स्वच्छ करून हा फेसपॅक २०-३० मिनिटे लावल्यास त्वचेला नैसर्गिक चमक आणि मृदुता मिळते.
नैसर्गिक उपाय अधिक फायदेशीर!
नैसर्गिक उपायांमध्ये नारळ तेल आणि कोरफड जेल देखील प्रभावी आहेत. नारळ तेल रात्रभर त्वचेला हायड्रेटेड ठेवते आणि अँटी-बॅक्टेरियल व अँटी-फंगल गुणधर्मामुळे त्वचा निरोगी राहते. कोरफड जेल मुरुम व डागांपासून सुटका देते आणि त्वचेला मऊ बनवते. मधाचे रात्रभर लावल्याने त्वचेला पोषण मिळते आणि मुरुम, डाग कमी होतात.याशिवाय भरपूर पाणी पिणे, फळे, भाजीपाला, ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स असलेले पदार्थ आहारात घेणे, तसेच थंडी, ऊन आणि वाऱ्यापासून त्वचेला सनस्क्रीन आणि स्कार्फने संरक्षण देणे महत्त्वाचे आहे. नियमित काळजी घेतल्यास ड्राय चेहरा मऊ, ताजातवाना आणि चमकदार दिसतो.रात्रीची योग्य त्वचेची दिनचर्या केल्यास सौंदर्य उत्पादनांच्या रासायनिक परिणामांची आवश्यकता कमी होते आणि नैसर्गिक त्वचेला नैसर्गिक चमक मिळते.