अध्यक्षांसह नगरसेवक उमेदवारांचे भाग्य मतपेटीत ‘बंद’

मशिनमध्ये तांत्रिक बिघाड

    दिनांक :20-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
election-news : यवतमाळ नगर परिषद निवडणुकीसाठी शनिवार, 20 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी 7 वाजेपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. वातावरणात गारवा असल्याने सकाळी मतदारांची पाहिजे तशी गर्दी दिसली नव्हती. तर 11 वाजतानंतर मतदानाचा जोर वाढला होता. धु्रुव प्राथमिक शाळेत मशिनमध्ये तांत्रिक अडचण आल्याने काही काळ मतदान प्रक्रिया खोळंबली होती.
 

fAF 
 
यवतमाळ नगर परिषद अध्यक्ष आणि 58 नगरसेवक पदासाठी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली आहे. शहरातील एकूण 2 लाख 32 हजार 315 मतदारांपैकी दुपारी 3.30 पर्यंत 98312 मतदारांनी मतदान केले. मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक विभागाने 248 मतदान केंद्रे तयार केली आहेत. या केंद्रात दुपारी 3.30 पर्यंत 42.32 टक्के मतदान झाले. यात तरुणांनी मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावला.
 
 
निवडणुकीसाठी मतदान केंद्राध्यक्ष, कर्मचारी असा 1200 कर्मचाèयांचा फौजफाटा उपस्थित होता. नगर परिषद अध्यक्ष निवडणुकीत काँग्रेस, भाजपा, शिंदेसेना, उद्धवसेना, बसपासह अपक्ष असे 9 उमेदवार रिंगणात आहेत. 58 सदस्यपदासाठी 299 उमेदवार निवडणूक लढवीत असून, या उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले आहे. आता मतदारराजांनी कोणाच्या पदरी मतदानाचे दान टाकले आहे. हे रविवारी, 21 डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.
एक बोगस मतदान
 
 
शनिवार, 20 डिसेंबरला येथील राज इंग्लिश शाळेमध्ये निवडणूक प्रतिनिधी ज्योती राऊत या स्वतः हजर असतानाच बोगस मतदान झाले. त्यांच्या नावावर दुसरेच कोणीतरी मतदान करून गेले. ज्योती राऊत मतदान करायला गेल्या असता तेथील निवडणूक अधिकाèयांनी त्यांना, तुम्ही मतदान करून गेल्या आहात असे म्हटले. निवडणूक आयोग जी शाई वापरत असते तीसुद्धा ज्योती यांच्या बोटाला नव्हती. हा प्रकार नंदू मेसेकर यांच्या लक्षात आला असता त्यांनी तेथील अधिकाèयांना याचा जाब विचारला. त्यावर अधिकारी उत्तर देऊ शकत नव्हते. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करून ओसी देऊन मतपत्रिकेवर मतदान करून घेतले. यवतमाळ नगर परिषदेच्या प्रभाग 29 येथे हा प्रकार घडला.
आज मतमोजणी
 
 
जिल्ह्यात यवतमाळ नगर परिषदेसह पांढरकवडा, वणी, घाटंजी, आर्णी, नेर, दिग्रस, पुसद, उमरखेड व दारव्हा नगर परिषदेची तसेच ढाणकी नगर पंचायतची मतमोजणी रविवार, 21 डिसेंबर रोजी होणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज असून पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे.
यवतमाळ नगर परिषदेसह जिल्ह्यातील पांढरकवडा येथे 2 जागांसाठी, दिग्रस येथे 3 जागांसाठी तर वणी येथे एका जागेसाठी मतदान घेण्यात आले. यात पांढरकवडा येथे 35.98 टक्के मतदान, दिग्रस येथे 58.51 टक्के मतदान तर वणी येथे 26.96 टक्के मतदान झाले.