यवतमाळ नपसह तीन नपतील प्रभागासाठी 42.42 टक्के मतदान

    दिनांक :20-Dec-2025
Total Views |
यवतमाळ,
yavatmal-municipal-council-voting : घेण्यात आलेल्या आक्षेपांमुळे लांबणीवर पडलेल्या यवतमाळ नगर परिषदेत नगराध्यक्षांसह 58 नगरसेवकांसाठी शनिवार, 20 डिसेंबर रोजी मतदान पार पडले. तसेच पांढरकवडा, दिग्रस व वणी येथील नगरसेवकांच्या 6 जागांसाठी मतदान पार पडले. दुपारी 3 वाजेपर्यंत 42.42 टक्के मतदान पार पडले. यवतमाळ शहरात मतदानात अनेक ठिकाणी गोंधळ उडाला होता. धु्रुव प्राथमिक शाळेत मशिनमध्ये तांत्रिक अडचण आल्याने काही काळ मतदान प्रक्रिया खोळंबली होती. तर राज इंग्लिश शाळेत निवडणूक प्रतिनिधी ज्योती राऊत यांच्या नावानेच बोगस मतदान झाल्याचे उघडकीस आले. वार्ड क्र. 15 मध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात एकाच्या डोळ्याला इजा झाली असून दोन जण गंभीर जखमी झाले.
 
 

KL