पराग मगर/संदीप नंदनवार
नागपूर
water tank rupture बुटीबाेरी एमआयडीसी परिसरातील फेज दाेन मधील साेलार सेल तयार करणाèया अवाडा कंपनीत शुक्रवारी एका पाण्याच्या टाकीची चाचणी सुरू असताना टाकी फुटून झालेल्या झालेल्या दुर्घटनेत सहा कामगारांचा मृत्यू झाला तर तब्बल दहा जण जखमी झाले. जखमींवर नागपुरातील काही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. हातावर पाेट घेऊन उत्तर प्रदेश आणि बिहार येथील असलेल्या या कामगारांमध्ये कंपनी प्रशासनाविराेधात संताप, कामाविषयी भीती आणि तरीही काम करावे लागणार ही अगतिकता दिसून येत हाेती.
कंपनीचे काम आज दिवसभर बंद
ही घटना घडली त्या वेळी कंपनीत काम करीत असलेल्या एका कामगाराने तरुण भारतला दिलेल्या माहितीनुसार साेलार सेल तयार करण्याच्या प्रक्रियेत पाण्याचा वापर हाेताे. त्यासाठी येथे लाेखंडी पत्र्याच्या दाेन विशाल टाक्या असून तिसèया टाकीचे काम पूर्ण हाेत आले हाेते. याच टाकीची पाणी साठवणूक क्षमता तपासण्याचे काम सुरू हाेते. त्यासाठी सकाळी 11 च्या सुमारात यात पाईपच्या सहाय्याने पाणी साेडले जात हाेते. परंतु समाेरच्या भागातून पाणी लिकेज व्हायला लागले आणि त्याच दबावात समाेरच्या बाजूने ही टाकी तडकली. त्यामुळे पाण्याचा भयानक माेठा लाेंढा कामगारांच्या अंगावर आला. यामुळे पाण्याच्या प्रवाहाने खाली काम करीत असलेले कामगार जाेरदार फेकले गेले. खाली असलेले माेठमाेठे पाईपही पाण्याच्या प्रवाहाने इतरत्र पसरले आणि या पाईपमध्ये अनेक कामगार दबले. तसेच संपूर्ण टाकीच चपकून भूईसपाट झाली. ठेकेदारांने लगेच ाेन करून ही माहिती प्रशासनाला दिली आणि इतरत्र मजुरांना मदतीसाठी बाेलावले.पाेकलँडच्या सहाय्याने दबलेल्या मजुरांना बाहेर काढण्यात आले. हे सगळे इतके अचानक झाले की काही कळायच्या आतच मजुरांवर काळाने घाला घातला.
चाचणी करताना जागा माेकळी का केली नाही?
तिसऱ्या टाकीची चाचणी शुक्रवारी केली जाणार हाेती. त्यासाठी त्याच पाणी साेडले जात हाेते. परंतु चाचणी केली जाणार असताना सुरक्षेच्या कारणास्तव हा परिसर काही वेळासाठी रिकामा करणे गरजेचे हाेते. ताे न केल्याने आमच्या सहकाèयांचा नाहक जीव गेल्याचा आराेप येथील कामगार करीत आहे. यामुळे अवाडा कंपनी प्रशासन सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर नसल्याची ओरडही कामगार करीत हाेते.
सगळे गप्प
ज्या परिसरात ही घटना घडली त्या परिसरात प्रवेश वर्जित करण्यात आला आहे. तसेच या घटनेबाबत कुणाशी बाेलू नये असे आदेशही सुरक्षा रक्षकांना दिल्याचे या परिसराला भेट दिली असता लक्षात आले.
एकाच्याही घरचे जवळ नाही
उत्तर प्रदेश आणि बिहारच्या विविध जिल्ह्यातील कामगार येथे काम करण्यासाठी आले आहे. बुटीबाेरी शहरापासून अवाडा कंपनी जवळपास 25 ते 30 किमी लांब असून याच परिसरात कामगार जमेल तसे राहतात. विशेष म्हणजे शंभर टक्के कामगार हे येथे एकटेच राहतात. त्यामुळे मृत असाे वा जखमी त्यांच्या जवळ घरचे म्हणावे असे कुणीच नसल्याचे वास्तव दिसून येत आहे.